Eknath Shinde-Suraj Jagtap-Vijay Shivtare Sarkarnama
पुणे

Eknath Shinde Group : शिवतारेंच्या कट्टर समर्थकावर मुख्यमंत्र्यांनी सोपवली राज्याची मोठी जबाबदारी

मी माझ्या कामाला बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरूवात करीत आहे.

सरकारनामा ब्यूरो

सासवड (जि. पुणे) : बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या युवा सेनेचा राज्यात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुरंदरच्या (Purandhar) सासवड शहरातील युवक नेत्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. युवा सेनेच्या `राज्य विस्तारकपदी` सूरज उत्तम जगताप (Suraj Jagtap) यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भगवा ध्वज हाती देत संघटना वाढीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जगताप हे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. (Suraj Jagtap appointed as Yuva Sena's state extension chief)

मुंबई येथील बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या कार्यालयात सूरज जगताप यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी युवा सेनेचे सचिव किरण साळी, जिल्हा संघटक ममता लांडे-शिवतारे, बारामती लोकसभा संघटीका गीतांजली ढोणे, हरिभाऊ लोळे, माजी उपसभापती दत्ता काळे, युवा सेना समन्वयक गणेश मुळिक, विजय ढोणे, संजय कटके उपस्थित होते.

सूरज जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आगामी निवडणुका व पक्षवाढ हे हित लक्षात घेऊन जगताप यांची निवड करण्यात आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणूनही सूरज जगताप हे काम करत आहेत.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पाठपुरावा केल्यामुळेच माझी नेमणूक झाली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे. मी माझ्या कामाला बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरूवात करीत आहे. बारामती लोकसभा भागातील युवा जिल्हाधिकारी, जिल्हा समन्वयक, तालुकाप्रमुख, तालुका समन्वयक व प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक घेऊन युवा सेना वाढीसाठी जोमाने काम करण्यासाठी सज्ज असेल. युवा सेनेच्या वाढीसाठी ताकदीने प्रयत्न करण्याच्या विजय शिवतारे व युवासेना सचिव किरण साळी यांनी सूचना केल्या आहेत, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT