Surekha Punekar Join BRS Sarkarnama
पुणे

Surekha Punekar Join BRS : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; BRS मध्ये प्रवेश

Surekha Punekar left NCP : सुरेखा पुणेकरांच्या प्रवेशावर आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार टीका केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. सष्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यावर भाजपने टीका केली होती.

तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी काल (बुधवारी) भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. सष्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्याच्या प्रवेशावर भाजपचे नेते, आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार टीका केली होती.

प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी एका जाहीर सभेत सुरेखा पुणेकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होती. 'राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे', असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्यानंतर राष्ट्रवादीने दरेकरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

"राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे. अशी घणाघाती टिका प्रवीण दरेकरांनी केली.

प्रविण दरेकरांना सुरेखा पुणेकरांनी आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं होतं. "घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय,'' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मोहोळ विधानसभा मतदार संघातून २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसकडून त्या इच्छुक असल्याची चर्चा होती. पण पक्षप्रवेश झाला नव्हता. त्यावर मात्र कुठल्याच अपेक्षेने राष्ट्रवादीत प्रवेश करीत नाही, असे स्पष्टीकरण सुरेखा पुणेकर यांनी दिलं होतं.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT