BMC Covid Scam News : '' कोविड घोटाळाप्रकरणी सुरज चव्हाणच टार्गेट का? जाधव,चहल...'' ; ठाकरे गटाच्या खासदाराची मोठी मागणी

ShivsenaUBT Political News : शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजय पाटकर यांनी कोविड सेंटर उभारण्यात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
BMC Covid Scam News
BMC Covid Scam NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीने विरोधात कोरोना काळात लाईफलाईन कंपनी केलेल्या घोटाळाप्रकरणी ईडी कडून बुधवारी(दि.२१) छापेमारी करण्यात आली आहे. कोविड सेंटर देण्यात आले, त्यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव होते. त्यांची चौकशी का करण्यात येत नाही आहे असा सवाल ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे

शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची पण कोरोना काळात उभारण्यात आलेल्या कोविड घोटाळाप्रकरणी चौकशी व्हायला हवी. केवळ सुरज चव्हाण यांनाच का टार्गेट केले जातेय असा प्रश्न विनायक राऊत(Vinayak Raut) यांनी केला आहे.

BMC Covid Scam News
Sachin Kalyanshetti News : ''...त्याठिकाणी आमच्या भावना तीव्र असतील!''; भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींचा कडक इशारा

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरु केलं. हे कोविड सेंटर वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांना चालवण्याचं कंत्राट दिलं होतं. त्यातीलच एक नाव म्हणजे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस याच कंपनीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणात आज बुधवारी ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सुजित पाटकर आणि सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने छापेमारी केली.

काय म्हणाले राऊत..?

ठाकरे गटातील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये काहीही तथ्य नसताना देखील निहारक त्रास शिवसैनिकांना देण्यात येत आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्याने शिवसैनिकांचा खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र अशा घाणेरड्या राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही आम्ही शिवसैनिक आहोत. असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

BMC Covid Scam News
Congress News : या 'तेरा' मतदारसंघात काँग्रेसला विजयाची खात्री; राज्यात डबल आकड्यात जाण्यासाठी कोअर कमिटीच्या बैठकीत ठरली विशेष रणनीती!

काय आहे प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय असलेले सुजय पाटकर यांनी कोविड सेंटर उभारण्यात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. कोरोना काळात लाईफलाईन कंपनी घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. कोविड सेंटर, वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. कोविड सेंटरसाठी वैद्यकीय उपकरणं खरेदी करताना अव्वाच्या सव्वा बिल आकरल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणात तपासाचे ससे मिरे लावण्यात आले होते. यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक महत्त्वाचे नेते देखील आहे. संजय राऊत यांना तर 100 दिवसांपेक्षा अधिक दिवस जेलमध्ये देखील राहावे लागले होते. सध्या ते जामिनावर बाहेर आहे.

BMC Covid Scam News
Pankaja Munde News: गुन्हा रद्द करण्यासाठी पंकजा मुंडे यांची खंडपीठात धाव..

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील अनिल परब, रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांचे PA मिलिंद नार्वेकर यांचा देखील यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक(Nawab Malik) यांना देखील जेलमध्ये पाठवण्यात आले होते. नवाब मलिक अद्यापही जेलमध्ये आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com