Surendra Pathare Will join BJP Sarkarnama
पुणे

Sharad Pawar: शरद पवार यांच्या पक्षातील आमदारपुत्र दसऱ्यापूर्वी सीमोलंघन करणार; भाजपच्या वाटेवर?

Surendra Pathare Will join BJP: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे हे आहेत. भाजपामध्ये असलेल्या बापू पठारे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता.

Sudesh Mitkar

Pune News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोरदार वाहत आहेत. आपली बार्गेनिंग पॉवर वापरून काही पदरात पाडून घेऊन अनेक जण पक्षांतर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. एखादं पद, आगामी निवडणुका तिकिटांचे हमी तसंच विकास कामांसाठी निधी मिळण्याबाबतचे आश्वासन घेऊन अनेक महाविकास आघाडीतील नेते सत्ताधाऱ्यांकडे जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अशातच पुण्यातून देखील पक्षांतराबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. पुण्यामध्ये सध्या आठपैकी सहा आमदार हे भाजपचे आहेत. तर एक आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि एक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे हे आहेत. भाजपामध्ये असलेल्या बापू पठारे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणावरून उमेदवारी देखील देण्यात आली त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता. पठारे यांच्या विजयामुळे पुणे शहरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकमेव आमदार मिळाला आहे.

मात्र सध्या आमदार पठारे यांचे चिरंजीव दसऱ्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. २,३,४ प्रभागात जर त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली तरच या अटीवर प्रवेश करणार सांगितलं जात आहे. त्याबाबत बैठक देखील दोन दिवसापूर्वी पठारे यांनी बैठक घेतली असल्याचा देखील बोललं जात आहे.

आमदार झाल्यानंतर बापू पठारे यांची महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसोबतची जवळी लपलेली नाही. ते सातत्याने अजित पवार यांच्या सोबत व्यासपीठावर देखील दिसले आहेत. तसेच निवडणुकीपूर्वी ते भाजपात असल्याने भाजपच्या नेत्यांसोबत देखील त्यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर खरंच सुरेंद्र पठारे हे भाजपवासी होणार का ? आणि झाल्यास आमदार पठारे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याबाबत सरकारनामा ने आमदार पठारे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या सगळ्या वावड्या असल्याचे सांगितले आहे. तसेच माझे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे काही राजकीय लोक हेतू पुरस्कार अशा प्रकारच्या वावड्या उठवत असून यात कोणत्याही तथ्य नसल्याचं पठारे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT