Pune News : पुण्यातील एफसी रोड वरील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणावरून पुन्हा एकदा विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यात येत आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अनधिकृत बारचा विषयी ऐरणीवर आला होता. या प्रश्नावर आंदोलन करताना सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती गंभीर आरोप केले होते. पैसे घेऊन अशा प्रकारच्या अनधिकृत व्यवसायांना बळ देण्यात येत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला होता.
यानंतर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला होता. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा शंभूरज देसाई यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.
सुषमा अंधारे Sushma Andhare म्हणाल्या, ड्रग्स प्रकरणावर गेली आठ ते नऊ महिने मी आपली भूमिका मांडत आहे. या महाराष्ट्राची लेक, बहीण आणि शिक्षिका म्हणून अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई अडकायला नको, म्हणून आम्ही भूमिका मांडतो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई आमचा आवाज बंद करण्याची भाषा करतात. आम्हाला धमक्या देतात. अब्रू नुकसानीचे दावे दाखल करण्याची भीती दाखवतात.
आज जे व्हिडिओ बाहेर आले आहेत. त्यामुळे एक्साईज खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. असा परिस्थितीमध्ये शंभूराज देसाई Shambhuraj Desai कोणावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा सुळसुळाट सुरू असून त्यावर नियंत्रण आणण्यात मंत्री शंभूराज देसाई हे अपयशी ठरले असून त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे, असाही आग्रह अंधारेंनी धरला.
पुण्यामध्ये नवनवीन ड्रग्स प्रकरण बाहेर येत असताना. एक्साईज अधिकारी राजपूत हे कोणाच्या वरदहस्तमुळे त्या पदावर ती कार्यरत आहेत . त्यांचे नीलंबन तर सोडा पण बदली देखील होत नाही. अधिकाराचे तात्काळ निलंबन करून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.