Sanjay Raut : आता लोकसभेच्या 'स्ट्राईक रेट'चा प्रश्नच येत नाही; विधानसभेपूर्वी संजय राऊतांचं सूचक विधान

Lok Sabha Election Strike Rate : 60 ईव्हीएम मशिनची मोजणी बाकी असतानाच विजय घोषित करून धुळ्याची जागा भाजप लुटण्याच्या प्रयत्नात होते.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभेत आम्ही 21 जागा लढल्याचे दिसत असले तरी सांगलीत काँग्रेस - राष्ट्रवादीने कामच केले नाही. त्यामुळे आम्ही 20 जागाच लढलो आहेत. त्यातच काही जागांवर केंद्रातील दबावातून प्रशासकीय यंत्रणेने आमच्या विरोधात काम केले.

याचा सर्वात जास्त फटका आम्हालाच बसला आहे. त्यामुळे आता स्ट्राईक रेटचा प्रश्नच येत नाही, असे सूचक विधान करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपात शरद पवार गट आणि काँग्रेसला लगाम लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहेत. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. त्यातल्या त्यात शरद पवार Sharad Pawar गटाने 10 पैकी 8, काँग्रेसने 17 तून 13 तर ठाकरे गटाला 23 पैकी फक्त 9 जागा मिळाल्या. असे असतानाही काही दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि काँग्रेसने स्वबळाची भाषा केली. तर शरद पवारांनी आघाडी टिकण्यासाठी कमी जागा घेतल्याचे विधान केले. यातून विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची चढाओढ आघाडीत सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, राज्यात 288 जागा असून कुणीही 289 जागा घेऊ शकत नाही. आता आम्ही तिघे एकत्रितपणे जागावाटपावर चर्चा करू. लोकसभेत अनेक ठिकाणी गैरसमजातून मशालीऐवजी चुकून धनुष्यबाणाला मतदान केले. आमच्या काही जागा हातातोंडाशी आलेल्या जागा दबावातून गेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्ट्राईक रेटची भाषा करून नये, असा आरोपही त्यांनी केला.

Sanjay Raut
Video Pune Drugs Case : ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिस 'अ‍ॅक्शन मोड'वर, हाॅटेल मालकासह पाच जण ताब्यात

दरम्यान, महाविकास आघाडीची सोमवारी होणारी बैठक पुढे ढकल्याचेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीची बैठक उद्या होती, मात्र काँग्रेसची दिल्लीत बैठक असल्याने ते तिकडे जाणार आहेत. अद्याप आमच्यात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. तर निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट सर्वात चांगला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

धुळ्याची जागा गुंडाळण्याचा प्रयत्न

राऊतांनी केंद्र सरकारवर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. देशभरात 100 अशा जागा आहेत तेथे भाजप केवळ 500 ते दीड हजार मतांनी जिंकल्या आहेत. धुळ्याची जागाही केंद्रातून दबाव आणून जिंकवून घेण्याचा भाजपचा डाव होता. 60 ईव्हीएम मशिनची मोजणी बाकी असतानाच विजय घोषित करून धुळ्याची जागा भाजप लुटण्याच्या प्रयत्नात होते. मात्र काँग्रेसच्या सतर्कतेमुळे त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि तेथे काँग्रेस जिंकली. याच पद्धतीने केंद्रात अशा 100 हून जागा आहेत त्या भाजपाने ओरबडल्याचा आरोप राऊतांनी केला.

Sanjay Raut
Rahul Gandhi : तुम्ही माझे घर, कुटुंब! खासदारकीच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचे ‘इमोशनल’ पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com