पुणे

Sushma Andhare : "फीती कापताना कॅमेऱ्यासमोर येणारे बाळांच्या मृत्यूवर गायब का?" अमरावती रुग्णालय मृत्यू प्रकरणावरून अंधारे आक्रमक

Amravati hospital baby deaths controversy : अमरावती रुग्णालयातील बाळांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केले. फीती कापताना कॅमेऱ्यासमोर येणारे अधिकारी आता कुठे आहेत, असा प्रश्न त्यांनी केला.

Sudesh Mitkar

Pune News : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात अचानक आग लागली. या दुर्दैवी दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास नवजात शिशू अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन स्फोट झाला. या स्फोटानंतर कक्षात तातडीने आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.

आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत बचावकार्य सुरू केले आणि इतर बालकांना सुरक्षितपणे कक्षाबाहेर काढले. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे सुषमा अंधारे म्हणाल्या, जरास भाजलं तर जीवाची किती तगमग होते... स्वयंपाक करताना पोळीची चुकून वाफ लागली तर स्वयंपाकात तरबेज असणारी गृहिणी सुद्धा बराच काळ हात पाण्याखाली धरते...

अमरावतीच्या सरकारी रुग्णालयातील त्या कोवळ्या जीवांची अवस्था काय झाली असेल... तीन बाळ या जगाचा भलाबुरा अनुभव घेण्याच्या आधीच जगाचा निरोप घेतला तर अजूनही काही बाळं मृत्यूशी झुंज देत आहे आपल्या अंगाची नेमकी नाही लाही लाही का होतेय हेही या बाळांना सांगता येत नाही...

सरकारमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दरवेळी भोंगळ कारभार उघड होतो. इन्फ्रा मॅन म्हणवणारे अशा रुग्णालयांच्या उद्घाटनाच्या फीती कापण्यासाठी सरसावून पुढे असतात त्यांचे हुजरे-मुजरे बॅनरबाजी करण्यासाठी पुढे असतात. पण आता या निष्पाप नवजात अर्भकांचे जीव तुमच्या सरकारच्या गलथान कारभारामुळे गेले त्यावर बोलायला मात्र एकही जण पुढे येणार नाही अशी टीका अंधारे यांनी केली.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, फार फार तर पुन्हा एकदा मृतांना दहा-पाच लाखाचा आकडा जाहीर करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचे विजय हास्य चेहऱ्यावर मिरवत सो कॉल्ड इन्फ्रा मॅन आणि स्वतःची वाहवा करून घेतील. आदिवासी वस्तीगृहातल्या मुलींना सर्पदंश झाला काय.. शाळेत जाणारा मुलगा खड्ड्यांमुळे अपघातात गेला काय.. रुग्णालयात जीवदान मिळावे म्हणून दाखल झालेले बाळ जीवाला मुकले काय निगरगट्ट सत्ताधाऱ्यांना फरक काय पडतो... मरणाऱ्या लेकरांचं कारण हिंदू मुस्लिम दंगल थोडीच आहे. असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT