Sushma Andhare, Sanjay Raut sarkarnama
पुणे

हा तर संसदीय लोकशाहीचा 'ईडी'घात!

सुषमा अंधारे यांची भाजपवर (BJP) टीका

सरकारनामा ब्यूरो

पुणे : प्रत्येक वेळेला ईडीची (ED) भीती दाखवायची, चौकशी लावायची, मानसिक खच्चीकरण करायचे, वेगवेगळ्या मार्गाने विरोधकांना हैराण करायचे अन् मग त्याला पैल तीरावर नेण्यासाठी तयार करायचे, हेच राजकारण भाजपने (BJP) सुरु केले असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला.

त्या पुण्यात बोलत होत्या. शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर चालू असलेल्या ईडी चौकशीवरुन अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. हा तर आपल्या संसदीय लोकशाहीचा ईडीघात असल्याची टीका त्यांनी केली. ईडीकडे जर एखाद्या विरोधात पुरावे असतील तर तुम्ही त्याची सारखी चौकशी का करता? त्याच्यावरती थेट कारवाई का करत नाही, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

तुम्ही प्रत्येक वेळेस चौकशीला बोलवता, समोरच्याला भाजपमध्ये येण्यासाठी संधी देता आणि आजपर्यंत फुटलेले आमदार याच पद्धतीने गेल्याचा आरोप अंधारे यांनी भाजपवर केला. राज्यात सत्तांतरही याच पद्धतीने केले. हा सरळसरळ संसदीय लोकशाहीवरचा घात आहे, असे त्या म्हणाल्या.

ईडी चौकशीवरही त्यांनी आक्षेप घेतले. आमचे ऐका नाहीतर हे करू, अशी भीती दाखवली जाते. तसेच खरेच पुरावे असतील तर वेळीच कारवाई का होत नाही, संधी का दिली जाते. आमदार-खासदार जे फुटले त्या प्रत्येकाचे रेकॉर्ड पाहिले तर त्यांना नोटीस दिलेली आहे. मात्र, वेळ दिल्याने ते दुसरीकडे गेले. राऊत यांचे मानसिक खच्चीकरण सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई केवळ सूडनाट्यातून करण्यात आली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आज पहाटे राऊतांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले. 9 तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना त्यांच्या भांडुपच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT