राऊतांची बेहिशोबी संपत्ती आमच्या नावावर : प्रविण राऊत आणि स्वप्ना पाटकरांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut | ED | Custody : पाटकर कुटुंबीयांचे राऊत कुटुंबीयांसोबत घनिष्ट मैत्रीचे आणि कुटुंबासारखे संबंध
Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena News
Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena Newssarkarnama

राऊतांची बेहिशोबी संपत्ती आमच्या नावावर

संजय राऊत यांची सर्व बेहिशोबी संपत्ती आमच्या नावावर असल्याचा खळबळजनक दावा पत्राचाळ प्रकरणी यापूर्वीच अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि या प्रकरणातील आणखी एक प्रमुख संशयित सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. पाटकर कुटुंबीयांचे राऊत कुटुंबीयांसोबत घनिष्ट मैत्रीचे आणि कुटुंबासारखे संबंध आहेत.

भाजप नेते मोहित कंबोज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

- भाजप नेते मोहित कंबोज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

- संजय राऊत यांच्यावर सुरू असणाऱ्या ईडी कारवाईनंतर मोहित कंबोज सागर बंगल्यावर दाखल

- अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय पांडे यांना झालेल्या अटकेनंतर आज संजय राऊत यांनाही ED कडून अटक होण्याची दाट शक्यता

- २०२२ च्या सुरूवातीलाच सलिम - जावेद जोडी गजाआड जाणार असे वक्तव्य मोहित कंबोज यांनी सर्वात आधी केले होते.

- यातच आज संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी कंबोज दाखल

संजय राऊतांच्या घरातून साडे अकरा लाख रुपये जप्त

आजच्या छापेमारी दरम्यान ईडीने संजय राऊत यांच्या घरामधून जवळपास साडे अकरा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम आपण घरखर्च आणि इतर खर्चासाठी बँकेतून काढली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे रक्कमेची पडताळणी केली जाणार असून, पडताळणी योग्य झाल्यास ही रक्कम राऊत कुटुंबियांना परत केली जाणार आहे. याशिवाय संजय राऊत यांचा मोबाईल देखील काढून घेण्यात आला आहे.

संजय राऊतांचा ईडी कार्यालयाबाहेरुन आक्रमक पवित्रा

ईडी कार्यालयाबाहेरुन बोलताना संजय राऊत म्हणाले होते, जी काय कारवाई व्हायची आहे ती होऊ द्या, मी घाबरत नाही. राजकीय सुडाने हे सगळे चालले आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांचे बळ माझ्या पाठीशी आहे आणि एक लक्षात घ्या संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो. हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरपट जात नाही. ईडी मला अटक करणार आहे आणि मी अटक होण्यासाठी जात आहे. विरोधकांना दाखवून देऊ शिवसेना काय आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी राऊत यांच्या कारवाईवर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल राऊत यांना विचारले असता महाराष्ट्र बदनाम होत आहे. पेढे वाटा, असा टोला त्यांनी लगावला. कुणी काहीही म्हणू द्या त्यामुळे या कारवाईला सुद्धा मी निधड्या छातीने सामोरे जात आहे. यातूनच महाराष्ट्राला सुद्धा बळ मिळेल. राजकीय सुडाच्या कारवाया भाजप विरोधकांवर सुरु आहेत. आमच्यासारखी ही काही लोक आहेत, जी न झुकता कारवाईला सामोरे जातात. काहीजण शरणागती पत्करतात. संजय राऊत असा नाही, मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही आणि शिवसेना सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांचे पहिले ट्विट 

आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही! जय महाराष्ट्र

अखेरपर्यंत लढणार! संजय राऊतांनी शिवसैनिकांना दिला खास संदेश...

आधी दोन्ही हात उंचावून संजय राऊत यांनी शिवसैनिकांना अभिवादन केले. नंतर गळ्यातील भगवं उपरणं राऊत यांनी गगनी फडकवलं आणि भगव्यासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार, झुकेगा नहीं'चा नाराही त्यांनी दिला...

काय आहे पत्राचाळ प्रकरण? 

पत्राचाळ येथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.

याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.

संजय राऊत यांना अटक केलेली नाही : 

संजय राऊत यांना ईडीने अटक केलेली नाही. पण ईडीने एकही कागदपत्र दाखवलेले नाही, संजय राऊतांचा जबाब घेऊ म्हणून ईडीचे अधिकारी त्यांना घेऊन गेले आहेत. आम्हीही तिथेच जात आहोत. - संजय राऊतांचे भाऊ सुनिल राऊत

संजय राऊतांनी हात उंचावले... दंडही दाखवले... 

संजय राऊत यांना ताब्यात घेवून जात असताना घराबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसैनिकांना हात उंचावून अभिवादन केले. तसेच आपण शेवटपर्यंत लढणार असल्याचा संदेश उपस्थित शिवसैनिकांना दिला. गाडीमध्ये बसल्यानंतर बाहेर येवून त्यांनी दंड दाखवून त्यांनी आत्मविश्वास कायम असल्याचे दाखवून दिले.

संजय राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी 

दरम्यान, शिवसैनिकांनी राऊतांच्या बंगल्यासमोर मोठी गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरदार घोषणा देत आहेत. सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा सुरू केला असून कुणालाही मध्ये येण्याास मज्जाव घालण्यात आला आहे.

चौकशीसाठी असहकार्य केल्यानेच ताब्यात घेतले असल्याचा ईडी अधिकाऱ्यांचा दावा

ईडीने पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं आज ईडीची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. ईडीकडून राऊतांना काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. आजही चौकशी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे.

संजय राऊत ईडीच्या ताब्यात 

तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळी राऊतांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने त्यांच्या घरी छापेमारी केली होती. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Sanjay Raut latest news)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com