Sushma Andhare
Sushma Andhare Sarkarnama
पुणे

Sushma Andhare : खर्गे मोदींना रावण म्हणाले, आता अंधारेंनी 'आलमपनाह' म्हणत डिवचलं!

सरकारनामा ब्यूरो

Pune Bandh: मागील अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने होत आहेत. महापुरूषांबद्दलसातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत आहेत. याचा निषेध वक्त करण्यासाठी विरोधीपक्षांनी आणि विवध शिवप्रेमी संघटनांनी पुणे बंदची (Pune Bandh) हाक दिला देण्यात आली होती. या मोर्चामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, "राज्यपाल या पदाबाबत आम्हाला आदर आहे. पण या पदावर बसलेली व्यक्ती आदर देण्याच्या लायकीची नाही. कोश्यारींना हे राज्यपाल विराजमान असल्याचे विसरत आहेत. जेव्हा ते महापुरुषांबाबत आक्षेपार्ह बोलले. तेव्हा, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी त्यांना थांबवले नाही. ४० चुकार भावांनी देखील त्यावर भूमिका थांबवले. यानंतर प्रसाद लाड इतक्या लाडात आले, की आमच्या डोक्यावर प्रसाद वाटायला लागले." अशी खोचक टोला, अंधारेंनी अंधारेंना केला.

अंधारे म्हणाल्या, "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण असं संबोधल्यानंतर फडणवीस यांनी आलामपनाहहसाठी तत्काळ माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. तशी प्रतिक्रिया राज्यपालांच्या वक्तव्यावर दिली नाही. आणि ज्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले त्यांना देखील निलंबीत करत नाहीत", अशी घणाघाती टीका अंधारेंनी केली.

'टीम देवेंद्र यांना सांगितले पाहिजे की, आपल्या मंत्रिमंडळात जे मंत्री महिलांबद्दल वक्तव्य करतात, ते महराजांचा वारसा सांगण्याच्या लायकीची नाहीत आणि अशी वक्तव्य करणारी माणसं तुमच्याच मंत्रीमंडळमध्ये येतात. एकनाथ भाऊ बाजूला बसले होते आणि गाडीचे स्टेअरिंग देवेंद्रजी यांच्या हातात होते, तसेच महाराष्ट्राचे स्टेअरिंग देखील देवेंद्रजी यांच्याच हातात आहे, म्हणुन मी देवेंद्रजी यांना विनंती करते की, या वाचाळवीरांना आवरायला पाहिजे. हा निंदाजनक ठराव या अधिवेशनात झाला नाही, तर हा अक्रोश वाढताना तुम्हाला दिसेल, असा सुचक इशारा देखील त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT