Pune News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिमागी नक्षल म्हणत सडकून टीका केली होती. या टीकेनंतर आता ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांचा शाब्दिक समाचार घेतला आहे.
याबाबत सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या, "विधानपरिषदेचा कार्यकाळ जसजसा संपत आहे, तसतशा टॅटूधारी वाघबाई उसने अवसान आणून अधिकाधिक आक्रमकता दाखवण्याचा, किंबहुना आक्रमकतेचं ढोंग रचण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
हा प्रयत्न करताना त्या मधूनमधून कारमधून आपण फारच काहीतरी मोठी मर्दूमकी गाजवतोय अशा थाटात गाडीतनं वगैरे व्हिडिओ बनवत असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी नाव न घेता चित्रा वाघ यांच्यावर केली.
सुषमा अंधारे पुढे म्हणतात, वाघबाई, तुमचा वकुब आहे का हो तेवढा? ज्या संजय राऊत यांनी आपल्यावरच्या आरोपांच्या साठी प्रसंगी जेलमध्ये जाणं पसंत केलं आणि तिथून कोर्टाच्या माध्यमातून आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी निकराचा लढा दिला, तिथे तुम्ही मात्र नवऱ्यावर लाचखोरीचे आरोप झाल्याबरोबर आणि ती बलामत आल्याबरोबर टुणकन उडी मारली. तुम्ही लाचखोरीसाठी लढला नाहीत, कारण तुम्हालाही माहीत होतं की ते प्रकरण खरं आहे असं अंधारे म्हणल्या.
त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांवर आम्ही बोलणंच टाळतो. बाकी तुमच्याबद्दल जिंतेंद्र आव्हाड असतील, मेहबूब शेख असतील किंवा आता विजय वडेट्टीवार असतील, हे सगळे लोक जे काही बोलतात त्याच्यानंतर आम्ही काही तुम्हाला बोलायची अजिबातच गरज नाही. पण हल्ली हल्ली तुम्ही मराठीपेक्षा हिंदीमध्ये फारच कुणाला ऐकवण्यासाठी व्हिडिओ करताय?" असा देखील खोचक सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.