sushma andhare, rupali chakanakar  sarkarnama
पुणे

Sushma Andhare Vs Chakankar : 'नग्नता वस्त्रांपेक्षा...',रुपाली चाकणकरांना सुषमा अंधारेंचे चोख प्रत्युत्तर

Sushma Andhare Targets Rupali Chakankar : रुपाली चाकणकर म्हणाल्या, संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न असल्याचे मनोवृत्तीच्या लोकांनी केला त्यांच्या विरोधात माझा लढा आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत चाकणकरांवर टीका केली आहे.

Roshan More

Sushma Andhare News : अशोक खरात प्रकरणानंतर महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला होता. खरात प्रकरणावरून चाकणकर यांना टार्गेट केले जात होते. अखेर त्यांनी या विरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

त्यामध्ये आपण आशा मिरगेसह इतर काही महिलांनी देखील कोणताही पुरावा नसताना आपल्याविषयी अतिशय बेताल विधानं केली.सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, कोणताही पुरावा त्या सादर करू शकल्या नाही, त्या सगळ्यांना दोन दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहेत, असे म्हटले आहे. तसेच संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न असल्याचे मनोवृत्तीच्या लोकांनी केला त्यांच्या विरोधात माझा लढा असल्याचे देखील चाकणकर यांनी म्हटले आहे.

चाकणकरांच्या या व्हिडिओनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. अंधारे म्हणाल्या की, 'सहज मोबाईल स्क्रोल करताना चाकणकर बाईंचा व्हिडिओ बघितला. आपण निधड्या छातीने लढणार आहोत असे त्या म्हणाल्या. निवेदनात काय म्हटलं कोणाला धमकी दिली त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. कारण नग्नतः वस्त्रांपेक्षा विचारांची अधिक असते.ज्याने त्याने ती तपासून घ्यावी'

'पण आता अचानक हे सगळं बोलावसं का वाटलं यावर जरा विचार केला तेव्हा लक्षात आलं उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिवस आहे ज्या पक्षामध्ये काही वर्ष अभिषिक्त सम्राज्ञी म्हणून अधिराज्य गाजवले. त्या पक्षाच्या वर्धापन दिनाला उजळ माथ्याने उद्या सहभागी होता येणार नाही. कदाचित अशा पद्धतीचे एखादे बोल्ड स्टेटमेंट करून राष्ट्रवादीच्या ज्या वरिष्ठांना पूर्णतः विसर पडला आहे त्यांना आपण अजूनही मैदानात आहोत हे सांगण्याचा कदाचित हा प्रयत्न असावा...', असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

अंधारे यांनी चाकणकर यांना पुढे म्हटले आहे की, प्रेमळसल्ला आजच्या निवेदनाचा व्हिडिओ जिथे जिथे शेअर केलाय त्याच्या खालच्या कमेंट एकदा वाचून घ्या.

खरात प्रकरणाशी संबंध नाही

अशोक खरात हा माझा अध्यात्मिक गुरु होता. त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी माझा संबंध नव्हता. खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती. जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुराव्याने माझा संबंध नव्हता. मी कधी कोणत्याही महिलेला खराताकडे घेऊन गेले नाही. ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता, असे रुपाली चाकणकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT