Rupali chakankar : 'संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न, आता कोर्टात भेटू...', रूपाली चाकणकर लढणार कायदेशीर लढाई

Rupali Chakankar on Ashok Kharat Case : 'खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती. खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुराव्याने माझा संबंध नव्हता. मी कधी कोणत्याही महिलेला खराताकडे घेऊन गेले नाही. ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता.'
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 Jun : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणांमध्ये नाव चर्चेत आल्यानंतर तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रूपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्यावर विविध माध्यमातून आरोप देखील करण्यात आले. आता या आरोपांविरोधात रूपाली चाकणकर यांनी कायदेशीर लढाई लढण्याच्या निर्णय घेतला आहे.

याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून यामध्ये रूपाली चाकणकर म्हणाल्या की, 'खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती. खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुराव्याने माझा संबंध नव्हता. मी कधी कोणत्याही महिलेला खराताकडे घेऊन गेले नाही. ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता.

पण तरीसुद्धा गेले दीड दोन महिने अतिशय अश्लील, अश्लाघ्य भाषेमध्ये विधानं करत कोणताही पुरावा नसताना माझ्यावर, माझ्या कुटुंबावरती केलेले आरोप हे अतिशय वेदनादायक होते आणि म्हणून आता ही माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून लढणार आहे. इतरांप्रमाणे माझ्या कुटुंबियांनी खराताला गुरु मानलं होतं आणि म्हणून जो पाद्यपूजेचा व्हिडिओ होता, तो अतिशय जुना व्हिडिओ होता.

त्या वेळेस मी आयोगाची अध्यक्षही नव्हते, पण तरीसुद्धा खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा, यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला. तरीसुद्धा ज्या पद्धतीची चिखलफेक झाली, AI चा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र जे रचलं गेलं, त्याच्यासाठीची ही लढाई कायद्याच्या चौकटीतून आणि म्हणून आशा मिरगे या बाईने डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विधानं केली,.

Rupali Chakankar
Nashik Shivsena UBT : कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी पण रस्ता दुरूस्तीसाठी पैसे नाहीत; ठाकरेंच्या नगरसेविकेने स्वखर्चाने दुरुस्त केला गावचा रस्ता!

ती विधानं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि म्हणून मी ४ एप्रिलला पहिली नोटीस ही आशा मिरगेला पाठवली होती. कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही, म्हणून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दोनदा ही नोटीस परत घरी पाठवली, एकूण तीन वेळा नोटीस पाठवली गेली पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही,.

अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. न्यायालयाने याची दखल घेऊन आशा मिरगेला २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे. त्यावेळेस मी देखील हजर असेलच, कारण की हा लढा आता स्त्रीत्वाच्या सन्मानाचा आहे. यामध्ये आशा मिरगेप्रमाणेच इतर काही महिलांनी देखील कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल विधानं केली.

सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, कोणताही पुरावा त्या सादर करू शकल्या नाही, त्या सगळ्यांना दोन दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहेत. दिल्ली हायकोर्टात सुद्धा मी उपस्थित राहणार आहे. हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा आहे, इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जाऊ नये यासाठी हा लढा आहे.

Rupali Chakankar
Jayant Patil : सातारा-सांगली विधानपरिषदेच्या उमेदवारीत शिवेंद्रराजे अन् उदयनराजेंना डावललं; साधी दखलही घेतली नाही : जयंत पाटलांचा वर्मी घाव

आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र, जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, भीमाईचा महाराष्ट्र, संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला आणि म्हणून या विकृतीच्या विरोधातला माझा लढा आहे. ही लढाई मी निश्चितपणाने लढेल, पहिल्या दिवसापासून जे सांगत आले ते आज ही सांगते, सत्य प्रखरतेने तुमच्यासमोर आहे.

कोणताही पुरावा नाही, कोणतंही दुष्कृत्य, गैरकृत्य कधीही केलेलं नाही. इतरांप्रमाणे आम्ही हे आध्यात्मिक गुरु खराताला मानलं होतं, याच्यापलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढतीये. २ जुलै सकाळी ११:०० वाजता आशा मिरगे हजर हो, मी स्वतः माझगाव कोर्टात असेल,' असं चाकणकर यांनी स्पष्ट केल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com