Suryakant Yewale sarkarnama
पुणे

Tehsildar Suryakant Yewale : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या करामती उघड! 14 वर्षात सात गंभीर गुन्हे; 'आप'च्या नेत्या सगळी हिस्ट्री काढली!

Pune Suryakant Yewale Vijay Kumbhar : पुण्याचे निलंबित तहसीलदार येवले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. मागील चौदा वर्षात त्यांचे तीनदा निलंबन झाल्याची माहिती आहे.

Roshan More

Vijay Kumbhar News : मुंढवा आणि बोपोडी गैरजमीन गैरव्यवहार प्रकरणात पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे नाव समोर आले होते. दरम्यान, बापोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्यांचे राज्य सरकारने निलंबित केले आहे. दरम्यान, मागील 14 वर्षात येवलेंवर सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी “सेटिंग” लावून बचावला, असे आपचे नेते, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर कुंभार यांनी पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?.

'येवले यांनी २००१ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. ३६१ गुण आणि अपंग (कर्णबधिर) कोट्यातून पास झाल्याने त्यांना नागपूर विभागात २००४ मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आले. पण खरंच कर्णबधिर आहेत का? नसतील तर हे थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल !त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असे म्हणतात. २००१ चा MPSC घोटाळा गाजला होता . ३९८ उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या,प्रत्येकाकडून ३–५ लाख रुपये घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई HC ने सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. ', असे देखील कुंभार यांनी सांगितले.

'येवले यांना २०११ मध्ये उमरेड (नागपूर) येथे १० हजाराची लाच घेताना पकडले .६ दोषारोपपत्रं ठेवण्यात आली, पण चौकशीचा पत्ता नाही. त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं पण सेटिंग लावून परत रुजू झाले . २०१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून २–२.५ लाख लाच घेतल्याचा आरोप . हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असे जाहीर केले.'

सेटींग करून पोस्टिंग

'२०१६ मध्ये पुणे विभागात बदली, पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी – मंत्रालयातून “सेटिंग” करून पोस्टिंग. २०१६ मध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू ५८ सरकारी जमिनींचं अनियमित वाटप, वाळूमाफियाकडून संगनमत यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी निलंबन केलं.१४ वर्षांत ७ वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी “सेटिंग” लावून बचाव!', असा गंभीर आरोप येवलेंवर कुंभार यांनी केला आहे.

'अमेडिया'साठी सक्रीय....

मोबोज हॅाटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आले, आंदोलने झाली परंतु पुढे काहीच झाले नाही. येवले "मुंढवा जमीन घोटाळा" प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय होते , असे देखील कुंभार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT