

Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar at odds again : चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात तिकीट वाटपावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या दोन्ही नेत्यांमधील वितुष्ट जगजाहीर आहे. चंद्रपूरमधील सारेच माजी नगरसेवक मुनगंटीवार यांच्या गटाचे आहेत.
आता शहराची धुरा भाजपने जोरगेवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ते कोणा कोणाचा पत्ता कापतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही इच्छुक दोन नेत्यांच्या भांडणामुळे आत्तापासूनच धास्तावले आहेत. चंद्रपूर महापालिके अंतर्गत येणाऱ्या चार सदस्यांच्या १७ प्रभागांची सोडत जाहीर झाली आहे. ६६ पैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव आहे. चार सदस्यांच्या प्रभागामुळे फारसा मोठा फटका कोणाला बसलेला नाही.
मनसेचे दोन वेळा निवडून आलेले सचिन भोयर यांना मात्र यावेळी लढता येणार नाही. त्यांच्या प्रभागातील पुरुषांच्या दोन्ही एससी आणि एससीसाठी आरक्षित झाल्या आहेत. माजी उपमहापौर संदीप आवारींना खुल्या प्रवर्गातून लढावे लागणार आहे. भाजपचे नगरसेवक राहुल घोटेकर, श्याम कनकम हेसुद्धा आरक्षणामुळे अडचणीत आले आहेत. हा अपवाद वगळता इतरांचे टेंशन गेले आहे. मात्र आता खरी लढत इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळवण्यासाठी आपल्या नेत्यांसोबत लढावी लागणार आहे.
जोरगेवार यांच्या नेतृत्वात प्रथमच भाजपला महापालिका लढावी लागणार आहे. ते वर्षभरापूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यापूर्वी ते अपक्ष आमदार होते. आता भाजपने त्यांना चंद्रपूरचे निवडणूक प्रमुख बनवले आहे. दुसरीकडे मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेपासून लांब ठेवण्यात आले आहे. शहरात त्यांचा हस्तक्षेप राहणार नाही, असाच बंदोबस्त भाजपने केला असल्याचे दिसून येते.
यापूर्वी संपूर्ण चंद्रपूर जिल्हा मुनगंटीवार सांभाळायचे. शहर आणि ग्रामीण दोन्हीकडे पक्षाचे अध्यक्ष त्यांचे समर्थक असायचे. यावेळी मात्र मुनगंटीवार यांच्या समर्थकाकडे ग्रामीणची जबाबदारी सोपवली आहे. शहरात मात्र जोरगेवारांच्या समर्थकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे तिकीट वाटप करताना त्यांचेच पारडे जड राहणार आहे. मुनगंटीवारांच्या कट्टर समर्थकांना डच्चू देताना त्यांना विजय खेचून आणणाऱ्या सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.