Pune NCP Sarkarnama
पुणे

Pune NCP : राष्ट्रवादीच्या पुण्यातील 'या' बड्या पदाधिकाऱ्याचे निलंबन; जयंत पाटलांची कारवाई

Sharad Pawar vs Ajit Pawar : जयंत पाटील यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाला. त्यानंतर अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला. यानंतर अजित पवारांनी पक्षात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यासही सुरवात केली आहे. तर दुसरीकडे पक्ष विरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या गटातील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता अंतर्गत लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बडतर्फ केलं आहे. याबाबतचे पत्रही जयंत पाटील यांनी जारी केलं आहे.

जयंत पाटलांनी पत्रात काय म्हटलं?

"महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी प्रदीप गारटकर हे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणाच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून आणि पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे", असं जयंत पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह वापरू नये, अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जयंत पाटलांनी या पत्राद्वारे दिला आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT