Pune Bus Rape Case accused datta Gade  Sarkarnama
पुणे

Datta Gade Arrested : दत्ता गाडेची शेवटची खबर कुणी दिली? पोलिस 1 लाख देणार, आयुक्त सत्कार करणार...

Swargate Police Gunat Village News : दत्ता गाडेला शुक्रवारी मध्यरात्री गुणाट या त्याच्या गावातच अटक करण्यात आली.

Rajanand More

Pune Rape Case : स्वारगेट बसस्थानकात बलात्कार प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी मध्यरात्री 75 तासांनंतर अटक करण्यात आली. पोलिसांनी एक वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून डझनभर पथके फिरत होती. पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. त्याला पकडून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केली आहे. गुणाट गावच्या नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. स्वारगेट पोलिसांनीच त्याला अटक केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. तर आधी आम्हीच त्याला पकडले असा दावा काही गावकऱ्यांकडून केला जात आहे.

गुणाट गावातील गणेश गव्हाणे यांनी आरोपीला आपणच आधी पकडल्याचा दावा केला आहे. त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, मीच त्याला आधी पकडले. त्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याला माझ्याकडून हिसकावून नेले, असा दावा गव्हाणे यांनी केला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यामध्ये कसल्याही प्रकारच्या श्रेयाचा प्रश्न नसल्याचे स्पष्टीकरण दिले. पोलिसांच्या सर्वच पथकांनी परिश्रम घेतले. गावकऱ्यांनीही सहकार्य केले, मदत केली. हे सर्वांचे मिळून यश आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. मी गावात जाऊन गावकऱ्यांचा सत्कार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याला मिळणार बक्षीस

पोलिसांनी जाहीर केलेले बक्षीस शेवटी खबर देणाऱ्या गावकऱ्याला दिले जाणार आहे. पोलिसांना खाडेला ज्या माहितीच्या आधारे अटक करण्यात आली, ती शेवटची माहिती ज्या गावकऱ्याने दिली त्याला हे एक लाखाचे बक्षीस दिले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT