Swargate Crime: राज्यात पुन्हा 'एन्काऊंटर स्कॉड'...? स्वारगेट बलात्कार घटनेनंतर संतापलेल्या 'या' शिवसेना आमदाराचे मोठे संकेत

Shivsena MLA On Encounter Squad In Maharashtra : पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी 72 तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती.
Swargate Crime.jpg
Swargate Crime.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणानं एकच खळबळ उडवली. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी सरकार आणि पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या गुन्हेगारी घटनांनी महिलांची सुरक्षितता अन् कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणीवर अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावरच विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.अशातच पुणे अत्याचार प्रकरणानंतर संतापलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आता मुख्यमंत्र्‍यांकडे मोठी मागणी केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी(ता.27) माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी स्वारगेट बसस्थानकातील बलात्काराच्या घटनेवर कठोर शब्दांत संताप व्यक्त केला.ते म्हणाले,तरुणीवरील अत्याचाराची घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.यावर फडणवीससाहेब योग्य ती कारवाई करतीलच अशी आम्हांला निश्चितच खात्री आहे.मात्र, यापुढे अशा घटना होऊ नये,यासाठी काहीतरी कडक शिक्षा होणे गरजेचं आहे.ही अशी घाण समाजातून गेल्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिलेला नाही,या शब्दांत राणेंनी आपली संतप्त भावना व्यक्त केली.

राणे म्हणाले,काही वर्षांपूर्वी एन्काऊंटर (Encounter) स्कॉड होता, असं आम्ही नेहमी सांगतो.अशा लोकांसाठी एन्काऊंटर स्कॉड परत आणण्याची वेळ आता आली आहे,असं मला वाटत आहे.एन्काऊंटर केल्याशिवाय आणि तो स्कॉड परत आणल्याशिवाय अशी लोकं सुधारणार नसल्याची स्पष्ट भूमिकाही निलेश राणेंनी यावेळी बोलून दाखवली.तसेच जोपर्यंत जीवाची भीती नाही तोपर्यंत हे असेच गुन्हे करत राहणार.त्यांच्या मनात भीती नाही.हे सगळेजण कुठल्यातरी नशेत आहेत,असंही त्यांनी सांगितलं.

Swargate Crime.jpg
Dattatray Gade arrested: स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेला अटक; कॅनॉलमध्ये बसला होता लपून...

त्याचमुळे आपण मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीससाहेबांना पुन्हा एन्काऊंटर स्कॉड आणा, अशी विनंती करणार आहे.काही एन्काऊंटर स्पेशालिस्ट तयार करा,त्यांच्यावर काही बंधने घालण्यात यावी, अशा लोकांना समाजात ठेवणं हे योग्य नाही.एकदा जेलमधून बाहेर आल्यानंतर ते परत तेच करणार आहेत,असेही शिवसेना (Shivsena) आमदार निलेश राणे म्हणाले.

यावेळी राज्यात महिलांची सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत आणि वाढत्या खून,बलात्कार,दरोडे,खंडणी,फसवणूक,धमकी,तोडफोड,विनयभंग यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली आहे.वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण होण्यासाठी एन्काउंटर स्कॉड परत आणण्यात यावा अशी मागणी राणे यांनी केली आहे.

Swargate Crime.jpg
Datta Gade Arrested : 'मला प्रचंड भूक लागलीय, जे काही केलंय, त्याचा पश्चाताप होतोय...,भेदरलेला दत्ता गाडे नातेवाईकांजवळ ढसाढसा रडला....

पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी 72 तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत त्याला अटक केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com