Deenanath Mangeshkar Hospital Sarkarnama
पुणे

Tanisha Bhise Death Case : डॉ.सुश्रुत घैसास यांचा पाय आणखी खोलात; मेडिकल कौन्सिलनं अखेर मोठं पाऊल उचललं, घेतला 'हा' निर्णय

Maharashtra Medical Council On Dinanath Mangeshkar Hospital: पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत सरकारला दोन अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानंतर देखील अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर करण्यात आली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Deepak Kulkarni

Pune News : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गरोदर महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणानंतर (Tanisha Bhise Death Case) गंभीर आरोप केले जात आहेत. यातच डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून घैसास यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. घैसास तसेच पीडित भिसे कुटुंबीय यांना मेडिकल कौन्सिलच्या मुंबई येथील कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने पाठवलेल्या नोटीसला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील (Dinanath Mangeshkar) तत्कालीन डॉ.सुश्रुत घैसास यांना सोमवारी (ता.14) संध्याकाळपर्यंत लेखी उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या उत्तरानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल डॉ. घैसास तसेच पीडित कुटुंबीय यांना चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ.विंकी रुघवाणी यांनी या नोटिसबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, राज्य महिला आयोगानं दिलेल्या आलेल्या सूचनांनंतर व पीडित भिसे कुटुंबीयांच्या तक्रारीनंतरच डॉ.घैसास यांना नोटीस बजावत त्यांना खुलासा मागितला आहे. यामुळे घैसास यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत सरकारला दोन अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानंतर देखील अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर करण्यात आली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याबाबत खुलासा केला आहे.

चाकणकर म्हणाल्या, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. पुण्यातील तनिषा भिसे हिच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहे. या प्रकरणात दोन अहवाला प्राप्त झाल असून मंगळवारी (ता.15) ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची दिशा निश्चित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT