Balasaheb Thackeray Speech : उबाठा सेनेचे नाशिकमध्ये शिबीर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे कधीही न ऐकलेले भाषण ऐकवणार

Uddhav Thackeray To Lead Thackeray Group’s Nashik Shibir on April 16 : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 16 एप्रिलला नाशिकमध्ये येत आहेत.
Balasaheb Thackeray
Balasaheb ThackeraySarkarnma
Published on
Updated on

Sena Camp in Nashik : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 16 एप्रिलला नाशिकमध्ये येत आहेत. शहरातील मनोहर गार्डन येथे त्यांचे एकदिवसीय संवाद शिबीर होणार आहे. या शिबिराच्या तयारीसाठी ठाकरे गट कामाला लागला असून त्यासाठी संजय राऊत हे आजपासून पुढील तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.

संजय राऊत यांनी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे न ऐकलेले भाषण या शिबिरात ऐकवण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे भाषण आहे, अशी माहिती शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संध्याकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे हे स्वत: या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचे उद्घाटन युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे या शिबिरात सहभागी होणार आहेत. असीम सरोदे यांनी शिवसेना उबाठाला नेहमी कायदेशीर मदत केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Balasaheb Thackeray
Chhagan Bhujbal : फुले चित्रपटाच्या बाजुने भुजबळ उभे राहिले, म्हणाले एकही सीन कट होता कामा नये...

विधानसभा निवडणुकीत उबाठा पक्षाला नाशिकमध्ये अपयश आलं. त्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकारी साथ सोडून अन्य पक्षात गेले. डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊतांनी अनेकदा प्रयत्न केले.

पण या शिबिराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हेच आता नाशिकच्या मैदानात उतरत असल्याचे दिसत आहे. या शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनकांचे मनोबल वाढविण्यासाठी पक्षाच्या तज्ज्ञांसह नेत्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे समजून घेतली जाणार आहे.

गोविंदनगरच्या मनोहर गार्डन येथे 16 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेपासून या शिबिराला सुरुवात होईल. एकूण तीन सत्रांमध्ये याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचा समारोप होईल.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा, संघटनात्मक बांधणी आणि पुढील वाटचालीवर यावेळी मंथन होणार आहे.

Balasaheb Thackeray
Chandrakant Patil Statement : शिंदेंची दादांविरोधात शहांकडे तक्रार? चंद्रकांत पाटील म्हणतात, खळखळ व्यक्त केली नाही तर...

दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले होते. त्यात सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी तर उपजिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांची जिल्हाप्रमुखपदी बढती करण्यात आली आहे. पक्षाची आणखी मजबुत बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणखी काही बदल करतात का हेही पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com