Satyajeet Tambe Banner sarkarnama
पुणे

Satyajeet Tambe Banner In Pune : काय सांगता : आमदार सत्यजीत तांबे ? ; निकालापूर्वीच पुण्यात झळकले बॅनर..

Nashik Graduate Election Results : माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची पाषाण परिसरात सत्यजीत तांबेंच्या विजयाचे फलक लावले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Teacher-Graduate Election Results : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज (गुरुवार ) निकाल आहे. मतमोजणीस सुरवात झाली आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल सांयकाळपर्यत जाहीर केले जातील.

मतमोजणीस सुरवात झाली असून सध्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करण्यात येत आहेत. वैध मते किती निघणार यावरुन या निवडणुकीत विजयाचे गणित बदलणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्याचे लक्ष आहे.

पण निकालापूर्वीच विजयांचे बॅनरबाजीला सुरवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांचा विजय झाल्याचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची पाषाण परिसरात सत्यजीत तांबेंच्या विजयाचे फलक लावले आहेत.

या फलकांची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे. जीत 'सत्या'चीच, आमदार सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन..असा आशय असलेले बॅनर सनी निम्हण यांनी लावले आहे. सनी निम्हण पूर्वी शिवसेनेत होते, ते सध्या भाजपमध्ये आहे, तांबेंच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनीही आपल्या विजयाचा दावा केला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे गणित शेवटच्या क्षणी बिघडल्याने आघाडीला नाशिकच्या जागेची फारशी अपेक्षा नाही. येथे काँग्रेस उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्जच दाखल केला नाही.

पक्षाची नाचक्की झाल्याने काँग्रेसने तांबे पिता -पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर आघाडीला नाईलाजाने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यावा लागला. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोन अपक्षांमध्येच लढत झाली.

सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्याचा आज निकाल आहे. 2 लाख 62 हजार 678 पैकी 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी हक्क बजावला आहेत. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे. मतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप आलं आहे.पोलीसांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.

अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत नागो गाणार व सुधाकर आडबाले, तर कोकण शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे.

अशी होणार मतमोजणी

  • प्रत्यक्ष मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या पसंतीची किती मते आवश्यक आहेत हे निश्चित करण्यात येईल.

  • पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळाल्यास उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल.

  • पहिल्या पसंतीची आवश्यक मते कोणत्याच उमेदवाराला मिळाली नाहीत तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील.

  • या उलट्या क्रमाने उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात येतील.

  • सर्व मतांची मोजणी झाल्यानंतरही पुन्हा आवश्यक मते मिळाली नाहीत तर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.

मतदारसंघनिहाय झालेले मतदान

  • नाशिक पदवीधर – ४९.२८ टक्के

  • अमरावती पदवीधर – ४९. ६७ टक्के

  • कोकण शिक्षक – ९१.०२ टक्के

  • औरंगाबाद शिक्षक – ८६ टक्के

  • नागपूर शिक्षक – ८६.२३ टक्के

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT