Chitra Wagh Sarkarnama
पुणे

हाथरसच्या घटनेवर अश्रू ढाळले; पुण्यातल्या घटनेवर का नाही : चित्रा वाघांचा प्रियंकांना सवाल

पुण्यातल्या घटनेनंतर केवळ पुणे शहर नव्हे तर राज्य हादरले आहे. कबड्डीपटू असलेल्या एका चौदा वर्षाच्या मुलीची र्निघृण हत्या करण्यात आली आहे.

उमेश घोंगडे

सरकारनामा ब्यूरो

पुणे : हाथरसच्या घटनेवर आपण दु:ख व्यक्त केले. अश्रू ढाळले.आजच्या पुण्यातील घटनेवर आपण गप्प का असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी क्रॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना केला आहे.(Tears were shed at the fall of Hathras; Why not on the incident in Pune: Chitra Wagh's question to Priyanka)

पुण्यात बळी पडलेली मुलगी आपल्याला मुलीसारखी नाही का ? की निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेशातच आपल्या संवेदना जागृत आहेत, असाही प्रश्‍न वाघ यांनी प्रियंका गांधी यांना उद्देशून विचारला आहे. महाविकास आघाडी सरकारची कायदा व सुव्यवस्था कुठे आहे, असा प्रश्‍नदेखील वाघ यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातल्या घटनेनंतर केवळ पुणे शहर नव्हे तर राज्य हादरले आहे. कबड्डीपटू असलेल्या एका चौदा वर्षाच्या मुलीची र्निघृण हत्या करण्यात आली आहे.या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.या पाश्‍र्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ट्विट करून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना प्रश्‍न विचारले आहेत.

उत्तरप्रदेशातील बलात्काराच्या घटनेचा उल्लेख करीत त्यावेळी प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचा दाखला वाघ यांनी दिला आहे.उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत.निवडणुका समोर ठेऊन राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी वातावरण तापविले आहे. त्यात प्रियंका गांधी आघाडीवर आहेत.या पाश्‍र्वभूमीवर त्यांना लक्ष्य करून वाघ यांनी ट्विट केले आहे.या माध्यमातून त्यांनी प्रियंका गांधी यांना प्रश्‍न विचारले आहेत

Edited By Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT