Khed Crime :  Sarkarnama
पुणे

Khed Crime : 17 कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी खेडच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे निलंबित

अनुराधा धावडे

Khed News : तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना १७ कोटी ५६ लाख रुपयांचे शासकीय महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. खेड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने वाघमारे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.त्यांच्यावरील या कारवाईने मात्र शेतकऱ्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी यासंदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

खेड तहसीलदार पदावर कार्यरत असताना वाघमारेंनी काही प्रकरणांत वादग्रस्त निर्णय घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब चौधरी यांनी त्यांच्या विरुद्ध दफ्तर तपासणी करण्याची मागणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मे २०२२ मध्ये केली होती. या तपासणीत वाघमारेंनी तब्बल २९ प्रकरणांमध्ये त्रुटी असल्याचे नमूद करत सप्टेंबर २०२२ मध्ये अहवाल सादर केला. (Khed News)

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने खेड उपविभागीय अधिकाऱ्यांना वाघमारेंनी कामात केलेली अनियमितता आणि गैरकारभारांबाबत दोषारोप ठेवण्याचे आदेश दिले. आरोपपत्राच वाघमारेंनी विविध आदेश मंजूर करताना नजराणा रक्कम भरून न घेतल्याने आणि गौणखनिजाचे आदेश पारित करताना योग्य कारणमीमांसा न करता दंड माफ केल्याने शासनाचे १७ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्याता आला. त्यानंतर राज्य सरकारने ४ सप्टेंबर रोजी वाघमारेंच्या निलंबनाचा आदेश काढला. (Crime News)

खेड तहसीलदार पदावरून नुकतीच वाघमारेंची बदली झाली होती. पण त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातून (MAT) आदेशास स्थगितीही मिळविली. पण उच्च न्यायालयाने मॅटच्या आदेशाला स्थगिती दिल्याने पुन्हा त्यांची बदली झाली होती

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT