Tukaram Supe News Sarkarnama
पुणे

Tukaram Supe News : तुकाराम सुपेंकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड...

Mangesh Mahale

Pune News: बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त आणि शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करून नुकताच गुन्हा दाखल केला आहे.

तपासात त्यांच्याकडे तीन कोटी ९५ लाख ३५ हजार ७९५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. सुपे यांच्या मालमत्तेची एसीबीकडून पु्न्हा चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडे नव्याने तीन कोटी ९५ लाख ३५ हजार ९९५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. .

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात सुपे यांना अटक करण्यात आली होती. सुपे यांची नाशिकमधील वडाळा विहार इमारतीत सदनिका असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. सुपे यांची पत्नी कल्पना यांच्या नावावर ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात खडकापाडा येथील अल्पेश अपार्टमेंटमध्ये एक सदनिका आहे. मुरबाड तालुक्यातील पाटगाव येथे सुपे यांनी पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली आहे.

आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथे सुपे यांची साई दर्शन इमारत आहे. पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात श्री दत्त कृपा तीन मजली इमारत आहे. तुकाराम सुपे, त्यांची पत्नी कल्पना, मुलगी कोमल, मुलगा तुषार यांच्या नावावर भोसरी येथील नंदनवन कॉलनीत इमारत आहे. सुपे यांचा पिंपळे गुरव परिसरातील गांगार्डेनगर येथे कल्पतरू बंगला असल्याचे चौकशीत उघडकीस आले.

राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांची पुणे ACB कडून चौकशी करण्यात येणार आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. बुधवारी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ॲक्शन मोडवर आलेले आहे. आता पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राज्यातील 8 बड्या अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT