Manoj Jarange: जरांगेंनी भुजबळांना करून दिली जेलवारीची आठवण...

Maratha Reservation: जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने तीन वर्षे शिक्षा होते हे कसे विसरतात...
Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nanded: "आजही गावखेड्यातील सर्व समाज बांधव एकोप्याने राहतात. एकमेकांच्या अडीअडचणीत मदत करतात. हा सलोखा आम्हाला कायम ठेवायचा आहे, पण कायदेशीर पदावर असलेली व्यक्ती जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करीत आहेत. त्यांना जाती जातीत भांडण लावायचे आहेत. हे त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देऊ नका. आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. एकजूट राहून हा लढा जिंकायचा आहे. एकदा का आरक्षण मिळाले, की मग मात्र आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही," असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी बारड (जिल्हा नांदेड) येथील मराठा आरक्षण जागर सभेत केले. या सभेत पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघातील बारड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उत्स्फूर्त आसा प्रतिसाद मिळाला. या सभेला प्रदीप सोळंके यांनी मार्गदर्शन करून मराठा समाजाला तातडीने ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली.

Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Winter Session 2023: उजनीच्या पाण्याचा भडका अधिवेशनात उडणार ; दोन आमदारांच्या बालेकिल्ल्यातील संघर्ष...

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मी किती शिकलोय याची माहिती घेण्यात आली. जे जास्त शिकलेत ते तीन वर्षे जेलमध्ये जाऊन आले आहेत. आम्हाला गावबंदीच्या पाट्या लावल्या म्हणून एक महिन्याची शिक्षा होते म्हणून सांगता, पण जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने तीन वर्षे शिक्षा होते हे कसे विसरतात, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षणाच्या लढाईबद्दल माहिती देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात ३५ लाख कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. या नोंद कायदा करण्यासाठी उपयुक्त आहेत. मराठा समाजाला आरक्षण वेळीच मिळाले असते तर जगातील सर्वात प्रगत जात म्हणून राहिली असती. आपल्या लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी जागृत राहून एकजुटीने लढा सुरू ठेवण्याची गरज आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही, असे आवाहन जरांगेंनी केले.

Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Winter Session 2023: शिंदेंचं कार्यालय लयभारी; ठाकरे गटावर मात, शिवसेनाप्रमुख अन् धर्मवीरांच्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com