Vasant More on Muralidhar Mohol Sarkarnama
पुणे

Vasant More on Muralidhar Mohol: मुरलीअण्णा, तुम्ही दिल्लीला गेलात..पण, आपल्या पुण्याला वालीच राहिला नाही

Thackeray group Vasant More attacked MP Muralidhar Mohol Pune RTO: पुणे आरटीओचा परिसर अस्वच्छतेचं केंद्र बनला आहे. आरटीओ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बंद पडलेल्या गाड्या वर्षानुवर्ष उभ्या करण्यात आल्या आहेत.

Sudesh Mitkar

Pune News: मनसेतून व्हाया वंचित बहुजन आघाडी नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले वसंत मोरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत.

पुण्यातील नागरी प्रश्नावरून त्यांनी पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली वारी करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे आण्णा पुण्यातील नागरी समस्यांवर लक्ष देतील का? असा सवाल त्यांनी केला आहे.

पुण्यामध्ये तब्बल दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. महापालिकेच्या कामांचे अधिकारी प्रशासकाकडे असल्याने आणि नगरसेवक नसल्याने स्थानिक समस्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे. असाच पुणे आरटीओचा परिसर अस्वच्छतेचं केंद्र बनला आहे. आरटीओ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बंद पडलेल्या गाड्या वर्षानुवर्ष उभ्या करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण झाला आहे. तसेच आरटीओ परिसरात देखील स्वच्छतेची वानवा दिसते. याबाबातची पोस्ट करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी मुरलीधर मोहोळ यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

वसंत मोरे म्हणतात, आमच्या स्मार्ट सिटीमध्ये असणाऱ्या पुणे शहराचे आरटीओ ऑफिस जिथे रोज शेकडो पुणेकर आपल्या कामानिमित्त जातात, त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील दुरावस्था नजरेसमोर येते, शेकडो पुणेकर इथे तासन् तास कामानिमित्त असतात जातात अनेक रोगराई सोबत घेऊन घरी येतात. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जीवालाही यामुळे धोका निर्माण झाला आहे.

मला असे वाटते या ठिकाणची साफसफाई पुणे महापालिकेने करायला पाहिजे अथवा आरटीओ कार्यालयावर कारवाई तरी केली पाहिजे, कारण साफसफाई करण्याची अशी कोणतीच व्यवस्था आरटीओ कार्यालयाकडे नाही, तरीसुद्धा या विषयांमध्ये आपल्या पुणे शहराचे नवनिर्वाचित खासदार केंद्रीय मंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे आण्णा लक्ष देतील का ?

आण्णा तुम्ही दिल्लीला गेलात खरे, पण आपल्या पुण्याला वालीच राहिला नाही...

कारण 2 वर्ष झाले बिचारे नगरसेवक पण घरीच आहेत तेव्हा आण्णा जरा तुम्हीच दिल्ली वारीतून वेळ काढा आणि आरटीओ कार्यालयाकडे लक्ष द्या आण्णा असा खोचक सल्ला त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना दिला आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT