ShivSena News Sarkarnama
पुणे

Shiv Sena News: ठाकरे सेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी तात्या लागले कामाला! इच्छुकांच्या मुलाखती...

Pune Municipal Corporation Elections 2025: वसंत मोरे हे ठाकरे सेनेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलच्या कामाला लागले आहे. महापालिका निवडणुका कधी होतील हे निश्चित नसताना देखील आत्तापासूनच ठाकरे सेनेने पालिका इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदेंच्या सेनेने पुण्यामध्ये लॉन्च केलेले मिशन पुण्याची चर्चा आहे. मिशन पुण्याच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील आणि काँग्रेस मधील नाराजांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेची सेना करीत आहे.

आगामी काळामध्ये ठाकरेंच्या सेनेला आणखी गळती लागण्याची शक्यता असतानाच ठाकरे सेनेने देखील मिशन पुणे लॉन्च केले आहे. त्याची जबाबदारी ठाकरे सेनेने वसंत मोरे यांना दिली आहे. 'कोणतेही युद्ध जिंकायचे असेल तर प्रथम त्याचे नियोजन करावे लागते,' असे वसंत मोरे म्हणाले.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेने तयारीला सुरुवात केली आहे. महापालिकेचे निवडणूक समन्वयक म्हणून वसंत मोरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवड केली आहे.

यानंतर वसंत मोरे हे ठाकरे सेनेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलच्या कामाला लागले आहे. महापालिका निवडणुका कधी होतील हे निश्चित नसताना देखील आत्तापासूनच ठाकरे सेनेने पालिका इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.

सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मतदारसंघातून ठाकरे सेनेकडून महापालिकेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मुलाखतीला उपस्थित राहण्याचे आवाहन वसंत मोरे यांनी केले आहे.

मिशन पुणे महानगरपालिका अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तसेच खासदार संजय राऊत यांच्या आदेशाने माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहीर तसेच पुणे शहर सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनात पुणे शहरप्रमुख संजय मोरे तसेच शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या नियोजन सहकार्यात सोमवारपासून पुणे मनपा निवडणूक इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय (पुलाची वाडी, पुणे) येथे या मुलाखती होणार आहेत.

  • सोमवार 17 फेब्रुवारी दु .3 वा. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा, दु. 4 वा. हडपसर विधानसभा , सायं. 5 वा. कोथरूड विधानसभा , सायं. 6 वा. पुणेकॅन्टोन्मेंट विधानसभा

  • मंगळवार 18 फेब्रुवारी दु. 3 वा. पर्वती विधानसभा दु. 4 वा. कसबा विधानसभा सायं. 5 वा. वडगाव शेरी विधानसभा सायं. 6 वा. खडकवासला विधानसभा असा मुलाखतीचा कार्यक्रम असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT