BJP vs MVA : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत युती तथा भाजपचा उमेदवार ठरल्यात जमा झाला.दुसरीकडे आघाडीतील हा सस्पेन्स कायम राहिलाच नाही,तर तो आणखी वाढला आहे.कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसनंतर आता ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेविकेने उमेदवारी अर्ज आज नेला.
ज्यांच्या निधनामुळे ही निवडणूक लागली ते भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने त्यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास नक्की झाल्यात जमा आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पुरुष नाही,तर महिलाच उमेदवारी देण्याची खेळी आघाडीकडून ऐनवेळी खेळली जाऊ शकते.
त्यातूनच याअगोदर राष्ट्रवादी(NCP) कडून माजी नगरसेविका माया बारणे यांनी हा अर्ज नेलेला आहे.तर, गुरुवारी( दि.२) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड पालिकेच्या माजी नगरसेविका रेखा दर्शिले यांनीही तो नेला.यामुळे आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
तसेच ही लढत युतीच्या महिला उमेदवाराविरुद्ध आपलाही महिला उमेदवार देऊन नवी खेळी आघाडी,तर खेळणार नाही, ना असेही आज ऐकायला मिळाले.दरम्यान,दर्शिलेंच्या तयारीतून ठाकरे शिवसेनेने (Thackeray Shivsena) आघाडीतील इतर दोन कॉंग्रेसला नेमका संदेश दिल्याची चर्चाही रंगली आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी १७ जणांनी ३२ अर्ज नेले. आतापर्यंत ६२ जणांनी १०८ हे अर्ज नेले.त्यात राष्ट्रवादीचे नाना काटे,शिवसेनेच्या दर्शिले,भाजपच्या जगताप यांचा समावेश आहे.अजय लोंढे या अपक्षाने उमेदवारी दाखल केली.आजपर्यंत फक्त तिघांचेच उमेदवारी अर्ज आले आहेत. तर, दोन दिवसांनंतरही कसब्याची पाटी कोरीच राहिली आहे. तेथून अद्याप एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज भरून दिलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.