Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune University Sarkarnama
पुणे

Pune : परीक्षेबाबत अधिसभाही नापास; पुणे विद्यापीठाच्या नवनियुक्त सदस्यांची पहिलीच सभा ठरली वादळी

सम्राट कदम

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवनियुक्त सदस्यांची पहिलीच अधिसभा वादळी ठरली आहे. यावेळी कोलमडलेल्या शैक्षणिक वेळापत्रकावर चर्चा झाली.

कुलगुरूंच्या दीड तास लांबलेल्या भाषणानंतर अधिसभा सदस्यांनी 'पॉईंट ऑफ ऑर्डर' चा आधार घेत सदस्यांनी अधिसभेचे लक्ष वेधले. यावेळी स्थगन प्रस्ताव देखील मांडण्यात आला.

कोरोनानंतर आता दोन वर्षे झाले आहेत. मात्र, तरी देखील तीन ते चार महिने शैक्षणिक वेळापत्रक लांबलेलेच आहे. त्यामुळे यामध्ये विद्यार्थी भरडला जात असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे विद्यापीठाचीही विश्वासार्हता धोक्यात येत आहे, असं मत यावेळी सदस्यांनी मांडलं.

अधिसभा सदस्य आंबेकर म्हणाले, ''परीक्षेचे निकाल, सत्राची सुरवात तसेच पुढील वर्षाची सुरवात सर्वच कोलमडलं आहे. एप्रिल २०२३ च्या शेवटपर्यंत सत्र परीक्षा चालू असेल तर पुढचे सत्र केंव्हा सुरु होणार?'', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

''सामाजिक कार्यक्रम, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची आंदोलनं, परीक्षांचे वेळापत्रक ऐनवळी बदल करण्यात येतो. या सर्व अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्याचे करीअर उध्वस्त होण्याची वेळ आली आहे'', असंही ते म्हणाले.

सदस्य राहुल पाखरे म्हणाले, ''परीक्षा विभागाच्या सुधारणेसाठी समिती गठीत करण्यात आली. पण त्या समितीची बैठकच होत नाही. विभागाचे तांत्रिक अत्याधुनिकरण गरजेचं आहे. परीक्षेतील अनियमिततेमुळे विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवरील विश्वास उडत चालला आहे, विश्वासार्हता धोक्यात येत आहे'', असं ते म्हणाले.

दरम्यान, सर्व विभागांना पुरेसे कर्मचारी नसल्याची बाब अधिसभा सदस्यांनी अधिसभेच्या लक्षात आणून दिली. यानंतर परीक्षेविषयीच्या भावना तीव्र आहे. कालमर्यादा ठेवून पुर्ण अहवाल सादर करू, असं अश्वासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT