Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

राज्य सरकार एकाच ‘बॉम्ब’ने चिडीचूप, अजून तर दुसरा फुटायचायं !

विधानसभेत राज्य सरकारच्या कटाची माहिती दिल्यानंतर आम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला जातोय.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : विरोधी पक्षनेत्यांना पद्धतशीरपणे अडकविण्याचा राज्य सरकारचा कट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उधळवून लावला. फडणवीस यांच्या एका ‘पेन ड्राइव्ह’च्या ‘बॉम्ब’ने राज्य सरकार चिडीचूप झालेय.अजून तर दुसरा बॉम्ब फुटायचा आहे, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

विधानसभेत राज्य सरकारच्या कटाची माहिती दिल्यानंतर आम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला जातोय. मात्र, यांच्या कोणत्याच धमकीला आम्ही घाबरणार नाही.विरोधी पतक्षनेते त्यांचे काम करीत आहेत. त्यांना कुठून माहिती मिळते अशी विचारणा करण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या माहितीवर बोला, असे आव्हान पाटील यांनी दिले.

केंद्रीय यंत्रणा त्यांचे काम करीत आहेत. त्याच्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही. मात्र, विरोधी पक्षनेते फडणवीस यांना आता नोटीस दिली आहे. यांचा केंद्रीय यंत्रणा आणि न्यायालय यापैकी कुणावरच विश्‍वास नाही. राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘‘ राज्य सरकार पाडण्याबाबत कुणीही वक्तव्य केलेले नाही.‘अब बारी मुंबई की है’ असे फडणवीस बोलले होते.यात शिवसेनेला विरोध नाही तर मुंबई महापालिकेची निवडणूक भ्रष्टाचाराविरोधातील असून ती जिंकण्याचा निर्धार होता. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलून सरकार आणि शिवसेना आजचे मरण उद्यावर ढकलत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय यंत्रणा वापरून पुरावे गोळा केल्याचा आरोप केला जातो. क्षणभर त्यांनी ते केलेय असं मान्य केले तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर मात्र,कुणी बोलत नाही. उलट संपूर्ण चित्रीकरण खोटं असल्याचा आरोप केला जोतोय, असे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT