RSS
RSS Sarkarnama
पुणे

RSS News : RSS चा वाढता विस्तार; वर्षभरात तब्बल आठ हजार शाखांची भर !

सरकारनामा ब्युरोे

Maharashtra News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी गेले वर्ष कार्यविस्ताराच्या दृष्टीने सकारात्मक ठरले आहे. गेल्या वर्षभरात संघाच्या देशभरात आठ हजार शाखा नव्याने सुरू झाल्या आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात २६५ स्थानी ६८३ शाखा सुरू आहेत. तर येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश जाधव यांनी दिली.

समलखा (पानिपत) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च दरम्यान पार पडली. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील (West Maharashtra Region) सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. १५) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सद्यःस्थितीत संघाच्या देशभरात ४२ हजार ६९३ स्थानी ६८ हजार ६५१ शाखा सुरू आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये ३७ हजार ९०३ स्थानी ६० हजार ११७ शाखा होत्या. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान देशभरात एकूण तीन हजार ६८५ संघ शिक्षा वर्ग पार पडले, असे सुरेश जाधव (Suresh Jadhav) यांनी सांगितले.

यावेळी जाधव यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील स्थिती सांगितली. त्यांनी सांगितले की, संघाच्या विविध वर्गामधून पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सहभागी स्वयंसेवकांची संख्या तीन हजार ३४१ आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात २६५ स्थानी ६८३ शाखा आहेत.

प्रांतात पुणे, नाशिक आणि कोल्हापूर असे तीन विभाग आहेत. त्यात १९२ विद्यार्थी, २३ महाविद्यालयीन, १२७ तरुण व्यवसायी आणि प्रौढांच्या १६९ शाखा आहेत. पुणे महानगरात ४९ स्थानी २७२ शाखा आहेत. यामध्ये १११ बालकांच्या, चार महाविद्यालयीन तरुणाच्या, ११५ विद्यार्थी तर ५४ तरुण व्यवसायी आणि १०३ प्रौढांच्या शाखा आहेत.

भविष्यात या पाच बाबींवर लक्ष केंद्रित करणार

- सामाजिक समरसता

- कुटुंब प्रबोधन

- पर्यावरण संरक्षण

- स्वदेशी आचरण

- नागरिक कर्तव्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT