Beed District : पाटोदा (जि. बीड) नगर पंचायतीच्या हद्दीतील मांजरा नदीवर २ कोटी ९३ लाख रुपयांतून पुलासह बंधारा बांधण्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम बनावट कागदपत्रांच्या आधारे तांत्रिक मान्यता मिळवून ते पूर्ण होण्यापुर्वीच देयके उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (High Court) जनहित याचिका दाखल झाली आहे.
या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी ३१ मार्च पर्यंत शपथपत्र दाखल करावे व बीड (Beed) पोलिस अधीक्षकांनी चौकशीसाठी सक्षम अधिकारी नियुक्त करून ६ एप्रिलपर्यंत अहवाल द्यावा, असे आदेश न्या. नितीन सांबरे व न्या. संतोष चपळगावकर यांनी दिल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. राकेश ब्राह्मणकर यांनी दिली.
या प्रकरणी अबलूस घुगे यांनी ॲड. नरसिंग जाधव व ॲड. राकेश ब्राह्मणकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानंतर पाटोदा मुख्याधिकाऱ्यांनी कारकूनास प्राधिकृत करून विठ्ठल रुपनर यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पाटोदा पोलिसांनी संशयित माहित असतानाही अज्ञातांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. असे न करता जे दोषी आहेत, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार असल्याचे ॲड. राकेश ब्राह्मणकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.