Pimpri-Chinchwad News : अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथील मराठा आरक्षण आंदोलकावरील बेछूट लाठीमारानंतर त्याविरोधात राज्यभर निषेध आंदोलनेच सुरू झाली नाहीत, तर बंदही पाळला जात आहे. बेमुदत उपोपणअस्त्रही मराठा समाजाने उपसले असून पिंपरी-चिंचवडमध्येही ते आजपासून (ता.७) सुरू करण्यात आले.
अंतरवाली सराटीसारखे हे बेमुदत उपोषण पिंपरीत मराठी क्रांती मोर्चाने सुरू केल्याने मराठा आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवडमधील (Maratha Reservation) समाजबांधव पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उपोषणास बसले आहेत.
यामध्ये सतीश काळे, लहू लांडगे, प्रकाश जाधव, जीवन बोराडे, नकुल भोईर, अभिषेक म्हसे सागर तापकीर, लक्ष्मण रानवडे, वैभव जाधव, सुनिता शिंदे, गोपाळ मोरे, रविशंकर उबाळे, सुनील शिंदे, लक्ष्मण पांचाळ, दीपक कांबळे, योगेश पाटील, स्वप्निल परांडे, प्रविण कदम, वचिष्ठ आवटे, वासुदेव काटे पाटिल, अमोल निकम आदी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक त्यात सहभागी झाले आहेत.
मनसेचे निषेध आंदोलन पिंपरीतच आंबेडकर चौकात
दरम्यान, जालना (Jalna) येथे मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीचार्ज करणाऱ्या राज्य सरकारचा मनसेनेही आज पिंपरीत जाहीर निषेध केला. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी केली. मनसेचे (MNS) शहराध्यक्ष आणि पिंपरी पालिकेचे पक्षाचे माजी गटनेते सचिन चिखले, हेमंत डांगे, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, राजू सावळे, विशाल मानकरी, मयूर चिंचवडे, अनिकेत प्रभु, स्नेहल बांगर, अलेक्स आप्पा मोझेस आदींनी त्यात भाग घेतला होता.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.