Jalna Political News :'मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, असा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन करणार. सरकार मराठ्यांना आरक्षण देईल, असा विश्वास आहे. त्यासाठी चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाईन', असे स्पष्ट करून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, कायद्याअंतर्गत मराठा समाजासाठी जे काही करता येईल ते सर्व करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे. (Latest Political News)
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार निजामशाहीत नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढण्यात आला होता. तो आदेश मान्य नसून मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी उपोषणावर ठाम राहिले. सरकारकडून मराठा समाजाला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यानंतर जीआर घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी आंतरवाली सराटी येथे जरांगेची भेट घेऊन सूचना असतील त्या मुंबईला येऊन कराव्यात. नाहीतर आपल्या वतीने शिष्टमंडळ सरकारशी चर्चेसाठी पाठवावे, अशी विनंती केली. यावर शिष्टमंडळ येऊन चर्चा करेन, असे जरांगेंनी जाहीर केले. मात्र जोपर्यंत सुस्पष्ट आदेश निघत नाही, तोपर्यंत उपोषण करण्यावर जरांगे-पाटील ठाम राहिले आहेत. तसेच आरक्षणासाठी जरांगेंनी राज्यातील मराठा समाजाला शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गाने पाठिंबा देण्याचेही आवाहन केले आहे. (Maharashtra Political News)
दरम्यान, चार दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर मराठा समजाच्या आरक्षणासाठी मुंबईत मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. यात आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निजामशाहीत नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेशही एका रात्रीत काढण्यात आले. मात्र हा आदेश मान्य नसून वंशावळ नसणाऱ्या मराठा लोकांनाही प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम राहून आंदोलन सुरूच राहणार असल्याची जाहीर केले.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.