Market Committee Election News Sarkarnama
पुणे

Pune Market Committee News : पुणे बाजार समिती निवडणूक : भाजपचा डोळा आयात नेत्यांवर; राष्ट्रवादीच्या इच्छुकांची धाकधूक वाढली

Market Committee Election News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुकांची भाऊ गर्दी पाहता, पक्ष अधिकृत पॅनेल जाहिर करण्याच्या मनस्थितीत नसल्याची जोरदार चर्चा आहे.

गणेश कोरे

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार (Market Committee Election) समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) बरोबरच भाजपा (BJP), शिवसेना (Shivsena) आणि शिवसेना (ठाकरे) गट यांनी स्वतंत्र आणि महाविकास आघाडी सह महायुतीचा अद्याप पॅनेल जाहिर न केल्याने सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुकांची भाऊ गर्दी पाहता, पक्ष अधिकृत पॅनेल जाहिर करण्याच्या मनस्थितीत नसल्याची जोरदार चर्चा आहे. जो निवडुन येईल त्यांना सोबत घेऊन, सभापती निवड करण्याचे सध्याचे धोरण दिसत आहे. तर भाजपाकडुन राष्ट्रवादीतील नाराज आणि विविध पक्षातील इच्छुकांची मोट बांधून सर्वसमावेश पॅनेल उभे करण्याची तयारी सुरू आहे.

पुणे बाजार समितीवर नेहेमीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, २००३ मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर सुमारे २० वर्षे प्रशासकीय आणि काही काळ भाजप प्रणित प्रशासकिय मंडळाची राजवट बाजार समितीवर होती. दरम्यान, आता सुरू झालेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस मोठ्या शक्तीनीशी उतरली आहे. यासाठी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी नुकताच एक मेळावा देखील घेतला. मेळाव्यात नविन आणि जुणे अनुभवी असा पॅनेल करण्याचे जाहिर केले. त्यानुसार मुलाखतीदेखील घेतल्या. मात्र, इच्छुकांमध्ये अनेक मातब्बर नेते सहभागी झाल्याने राष्ट्रवादीपुढे मोठा पेच निर्माण झाला असल्याचे सांगितले जात आहे.

तर भाजपाकडुन देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस मधुन आयात केलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपाच्या पॅनेल मध्ये मुळचे भाजपच्या फारच कमी उदेवारांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपाच्या पॅनेलमध्ये रोहिदास उंद्रे आणि सुदर्शन चौधरी हे भाजपाचे असून, अन्य चर्चेत असलेल्या नावांमध्ये माजी सभापती प्रकाश जगताप, दिलीप काळभोर, राजाराम कांचन, विकास दांगट, शुक्राचार्य वांजळे, या राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. (Political Breaking News)

जिंकेल तो आमचा राष्‍ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका?

उमेदवार अर्ज छाणनीनंतरदेखील अद्याप पॅनल जाहीर झालेले नाहीत. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) दोन दिवसांत पुण्यात होते. मात्र. त्यांनी बाजार समितीच्या निवडणुतकीबाबत कोणतीही बैठक घेतली नसल्याने राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. त्यांची धाकधुक वाढली आहे. दरम्यान, दोन दिवसांत पॅनल जाहीर होण्याची शक्यता उमेदवार व्यक्त करत असले, तरी इच्छुक मातब्बरांची संख्या पाहता पक्षश्रेष्ठी कोणालाही नाराज न करता जो जिंकेल तो आमचा या भूमिकेत असल्याचे सध्याचे चित्र आहे. (Latest Pune News)

आम्हीच पक्षाचे अधिकृत उमेदवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसशी निगडीत असलेले ज्येष्ठ माजी संचालक विलास भुजबळ, गणेश घुले यांनी स्वतंत्र अर्ज भरले आहे. भुजबळ यांनी अमोल घुले यांना तर गणेश घुले यांनी अनिरूद्ध भोसले यांना सोबत घेतले आहे. तर सौरभ कुंजीर व शिवाजी सुर्यवंशी यांनी सोबत अर्ज दाखल केले. हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्ठावान असून, आपल्यालाच अजित पवार यांनी अर्ज दाखल करण्याच्या सुचना दिल्याचे सर्व जण सांगतात. यामुळे राष्ट्रवादीकडुन दोन जागांसाठी ६ उमेदवार असल्याने पक्षाचे अधिकृत उमेदवार नक्की कोण? असा प्रश्‍न उमेदवारांसह मतदारांना पडला आहे. (Latest Maharashtra News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT