Pimpri-Chinchwad News Sarkarnama
पुणे

PCMC Crime News : पिंपरी-चिंचवड हादरले; माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला

Pimpri-Chinchwad Police News : पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी घटना टळली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) मोठी घटना टळली आहे. पुनावळे येथील माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट खंडणी विरोधी पथकाला उधळून लावण्यात यश मिळाले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ओव्हाळ यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. माथाडीच्या कामावरून ओव्हाळ आणि सराईत गुन्हेगार अमोल गारगले यांच्यात पंधरा दिवसापूर्वी वाद झाला होता. याच वादातून ओव्हाळ यांची हत्या करण्याचा कट गारगले, किशोर बापू भोसले आणि अमित दत्तात्रय पाटूळे यांनी रचला होता, अशी माहिती समोर येत आहे.

यासाठी तडीपार गुंड रविराज केदार यांच्याकडून पिस्तूल, दोन जिवंत काडतुस ही आणली होती. मात्र, त्याअगोदरच त्यांचा हा डाव हाणून पाडत खंडणी विरोधी पथकाने त्यांना अटक केली. पैकी पिस्तुल पुरवणारा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गारगले त्याच्या साथीदारांसह पुनावळे परिसरात माथाडीचे काम करतो.

ओव्हाळ यांची पाच एकर जमीन नुकतीच डेव्हलपमेंटसाठी बिल्डरला दिली आहे. तिथल्या माथाडीच्या कामावरून ओव्हाळ आणि गारगले यांच्यात वाद झाला होता. हे काम हातातून गेल्यानंतर पुन्हा आपल्याला काम मिळणार नाही. या उद्देशाने ओव्हाळ यांची हत्या करण्याचा प्लॅन गारगले याने केला होता.

सोलापूर (Solapur) मंगळवेढा येथून तडीपार असलेला केदारी याच्याकडून पिस्तूल व काढतुसेही आणली होती. पुढील दोन–तीन दिवसांमध्ये ओव्हाळ यांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता. त्या अगोदरच खंडणी विरोधी पथकाने आरोपींच्या मुस्क्या आवळत मोठा हत्येचा कट उधळून लावला आहे.

हा हत्तेच कट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस (Poilce) उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांच्या टीमने उधळून लावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT