Chandrakant Patil, Pimpri-Chinchwad Police Sarkarnama
पुणे

चंद्रकांतदादांवर शाई फेकणाऱ्यावर ३०७ चा गुन्हा; असिम सरोदे उतरले मैदानात

Chandrakant Patil News : शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी लावली गंभीर कलमे

सरकारनामा ब्यूरो

Chandrakant Patil News : भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शनिवारी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे या कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मात्र, या गुन्ह्यात लावण्यात आलेल्या कलमा वरुन आता नवीन वाद सुरु झाला आहे. या संदर्भात अॅड. असिम सरोदे यांनी ट्वीट करत पोलिसांनी लावलेल्या कलमांवर आक्षेप घेतला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की ''शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे. यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध'', असे सरोदे यांनी म्हटले आहे.

तर दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, 'मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात आहे. कलम 326 शस्त्राचा वापर करून गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यासाठी सुद्धा 10 वर्षे (किंवा जन्मठेप) अशी शिक्षा होऊ शकते मग शाईफेकी साठी कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले? इतकाच प्रश्न आहे.' यावरुन आता पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्याता वर्तवली जात आहे. या शाईफेकीनंतर ११ पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे.

दरम्यान, पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. चिंचवडमधील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पाटील उपस्थित होते. त्या आधी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT