Pankaja Munde : माफी मागितल्यावर माफ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती..

Bjp : चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या वयस्कर नेत्याच्या तोंडावर शाईफेक करणे ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
Pankaja Munde Reaction News, Aurangabad
Pankaja Munde Reaction News, AurangabadSarkarnama

Beed News : भाजपचे नेते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतीबा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अवमानकार विधान केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. Chandrakant Patil पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली. यावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Pankaja Munde Reaction News, Aurangabad
Samrudhi Highway : बाळासाहेबांच्या नावाने असलेल्या `समृद्धी` च्या लोकार्पणापासून उद्धवसेना दूरच..

एखाद्या राजकीय नेत्याने केलेल्या विधानबद्दल कुणाला वाईट वाटले असेल, त्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील आणि त्याबद्दल त्या व्यक्तीने माफी मागितली असेल तर त्याला माफ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. (Pankaja Munde) चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या वयस्कर व्यक्तीवर अशा प्रकारे शाईफेकणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. नेत्यांनी महामानवांबद्दल बोलूच नये असे मला वाटते. (Bjp)

पण एखाद्यावेळी चूकन झालेल्या विधानावर माफी मागितल्यानंतर माफ केले पाहिजे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर राज्यातील वातावरण अधिकच तापले आहे. भाजप विरुद्ध इतर राजकीय पक्ष, संघटना एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी देखील आक्रमक भूमिका घेत जशास तसे उत्तर देवू शकतो अशी भाषा वापरल्याने संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपली या विषयावरील भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी खरतंर चंद्रकांत पाटील यांचे विधान व त्याचा व्हिडिओ उशीरा बघितला. त्यांच्या विधानामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे हा विषय आता थांबला पाहिजे असे माझे मत आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या वयस्कर नेत्याच्या तोंडावर शाईफेक करणे ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखाद्या झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली तर त्याला माफ करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना माफ करून हा वाद थांबवला पाहिजे, अशी आपली प्रमाणिक अपेक्षा असल्याचे पंकजा म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com