Pune Porsche Accident Sarkarnama
पुणे

Pune Hit and Run Case : आता पोलीस अपघातग्रस्त 'Porsche'च्या कॅमेऱ्यातील चित्रीकरणही तपासणार!

सरकारनामा ब्यूरो

Pune Hit and Run Case Upadte : पुण्यात कल्याणीनगर येथील ‘हिट ॲंड रन’ प्रकरणाने राज्यभर एकप्रकारे खळबळ माजवली आहे. शिवाय, याप्रकरणी सुरुवातीस अल्पवयीन आरोपीला अपघातानंतर काही तासांतच जामीन दिला मिळाल्याने, सर्वचस्तरातून संतापही व्यक्त केला गेला. यानंतर सरकार पातळीवर आणि प्रशासकीय यंत्रणाकडून वेगवान हालचाली झाल्या. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातल्याचे दिसून आले. शिवाय, पोलीस विभागाही कडक कारवाईसाठी सरसावला असून, सखोल तपास सुरू आहे.

पोलिसांनी आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथून पकडले आहे. शिवाय, आता अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या कारमधील कॅमेऱ्याने टिपलेले अपघाताचे चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात मदत होणार आहे.

तर दुसरीकडे आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला पुणे न्यायालयापुढे हजर करण्यासाठी आणले असता न्यायालयाने अगरवाल याच्यासह दोघांना 24 तारखेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याणीनगर येथे रविवारी (ता. 19) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव आलिशान मोटारीने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन्ही पब, घटनास्थळ आणि येरवडा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन आरोपीने मद्य सेवन केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आता पोलिस त्या आलिशान मोटारीतील कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासणार आहेत. याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

या प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागं झालं आहे. संपूर्ण राज्यभर रात्री उशीरापर्यंत चालणारे पब, बार, मद्यपेय देणारी हॉटेल्स तपासणीची धडक मोहीम राज्य उत्पादन शुल्क हाती घेतली असून याबाबतची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे.

हॉटेलचे मालक, व्यवस्थापकांना न्यायालयीन कोठडी -

कल्याणीनगर अपघात प्रकरणी कोझी हॉटेलचे (Cozy Hotel) मालक, व्यवस्थापक आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी याबाबतचे आदेश दिले. 'कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक संदीप रमेश सांगळे, असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलमालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT