पुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महापालिकेत झालेल्या हल्ल्यावरून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या कुचराईबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार (Vikramkumar) यांच्याकडे लेखी खुलासा मागितला आहे.
या प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारच्या दबावाखाली येऊन पुणे पोलिसांनी आरोपींच्या सोयीची कलमे लावली आहेत.परिणामी आरोपींना तत्काळ जामीन मिळाला आहे.अशी भूमिका पक्षाच्यावतीने मांडण्यात आली.संबंधित आरोपींवर कडक स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनत करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या शुक्रवारी महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर सोमय्या यांच्यावर हल्ला झाला तिथेच शहर भाजपाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी किरीट सोमय्या महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन जम्बो कोवीडच्या चौकशीच्या मागणीचे निवेदन देणार आहेत. सोमय्या यांच्यावर झालेलल्या प्रकरणानंतर भाजपा-शिवसेनेत वाद पेटला असून वाद थांबण्याऐवजी आणखी उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.
या साऱ्या पाश्र्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी महापालिकेच्या आवारात झालेल्या प्रकाराबाबत आयुक्तांकडे सविस्तर खुलासा मागितला आहे. शनिवारी सुटीचा दिवस असताना शिवसैनिक मोठ्या संख्येने महापालिकेत कसे आले ? त्यांना प्रवेश कुणी दिला ? सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबाबत वेळीच अवगत का करण्यात आले नाही, असे प्रश्न महापौरांनी या पत्रात विचारले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.