Pune Drugs Racket Sarkarnama
पुणे

Pune BJP : भाजप आमदाराला मोठी चिंता; म्हणाला, पुण्याचा पंजाब व्हायला नको...

Sudesh Mitkar

Pune News, June 15 : मागील काही दिवसांपासून पुणे आणि शहर परिसरामध्ये ड्रग्ज रॅकेट बाबतचे नवनवे खुलासे बाहेर येत आहेत. त्यामुळे शहर परिसरात ड्रग्सच्या विळख्याची व्याप्ती समोर येत आहे. अशातच पुणे शहरामध्ये तरुणांना बरबाद करण्यासाठी इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेट कोरेगाव पार्क येथे सुरू असल्याचा खुलासा करत त्याबाबतची चिंता भाजप आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ समूहातर्फे आज 'पुणे जिल्ह्याच्या विकासाचा रन वे' या अंतर्गत अधिवेशन पूर्व आमदार संवाद बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या आमदारांनी उपस्थिती लावली. आगामी अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघातील कोणते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहात याबाबत आमदारांनी चर्चा केली.

यावेळी सुनील कांबळे (Sunil Kamble) म्हणाले, कोरेगाव पार्क येथे सुरू असलेले ड्रग्ज रॅकेट हा गंभीर प्रश्न आमच्या पुढे उभा ठाकला आहे. तरुणांना व्यसनाधीन करण्यात येत आहे. या विरोधात आम्ही अनेक वेळा आंदोलने केली, मात्र आम्ही सत्ताधारी पक्षात असतानादेखील आंदोलन का करता? असं काही लोक प्रश्न विचारतात. मात्र कोरेगाव पार्क येथे सुरू असलेलं ड्रग्ज रॅकेटचे इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचा आम्हला संशय आहे.

हे रॅकेट फक्त कोरेगाव पार्क, विमान नगर या भागापुरते मर्यादित राहिले नसून शहरातील अनेक हॉटेल्स आणि कॉलेजमध्ये ड्रग्ज सप्लाय करण्यात येत आहे. या माध्यमातून तरुण पिढी बरबाद करण्याचं इंटरनॅशन रॅकेट सुरू आहे. त्यामुळे पुण्याची (Pune) पंजाबसारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही, अशी चिंता कांबळे यांनी व्यक्त केली.

विकास कामं होतील, निधी मिळेल नागरिकांचे प्रश्न सुटतील मात्र तरुणांना बरबाद करणाऱ्या या ड्रग्स रॅकेटकडे सर्वांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यामुळेच या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं सुनील कांबळे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT