Ajit Pawar : लोकसभा निकालानंतर अजितदादांचे आमदार अलर्ट! अधिवेशनात 'हॉट इश्यू' लावून धरणार...

Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर राहिला. सरकार आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नसल्याची भावना मराठा समाजामध्ये असल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसल्याचं पाहायला मिळालं.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Pune News, 15 June : विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व बाबी तातडीने मार्गी लावून हा मुद्दा कायमचा निकाली काढावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) आमदार आग्रही भूमिका मांडणार आहेत. तसेच या अधिवेशनामध्ये आपण या संदर्भात भूमिका मांडणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

सकाळ समूहातर्फे आज 'पुणे जिल्ह्याच्या विकासाचा रन वे' या अंतर्गत अधिवेशन पूर्व आमदार संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या आमदारांनी उपस्थिती लावली. आगामी अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघातील कोणते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहात याबाबत आमदारांनी चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षणावरही अधिवेशनामध्ये चर्चा घडवून आणणार असल्याचं आमदारांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा ऐरणीवर राहिला. सरकार आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नसल्याची भावना मराठा समाजामध्ये असल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारचा फटका आपल्याला बसू नये यासाठी बहुतांश आमदार हे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने तातडीने तोडगा काढावा अशा भूमिकेत आहेत. अशिच काहीशी भूमिका अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी मांडली.

Ajit Pawar
Video Uddhav Thackeray : मला भाजपसोबत जायचं आहे, पण...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'प्लॅन'

सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात जातीचं आणि धर्माचं राजकारण झालं. हे वातावरण थांबून राज्यामध्ये कुठेतरी सामाजिक सलोखा निर्माण झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचे जे धोरण राज्य शासनाने हाती घेतला आहे, ते तातडीने अंमलात आणणे आवश्यक आहे.

Ajit Pawar
Nitish Kumar : सर्वात मोठी बातमी! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा आरक्षणाचा मुद्दा या अधिवेशनात निकाली काढतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. सामाजिक सलोखा जपून प्रत्येक समाजाला विश्वासात घेऊन हा निर्णय सरकारने घेणे अपेक्षित आहे. तशी आग्रही भूमिका आहे अधिवेशनादरम्यान घेऊ असं सुनील शेळकेंनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com