Anna Bansode
Anna Bansode Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीचा साक्षीदार असल्याचे समाधान; आमदार बनसोडे आताच का बोलले?

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar and Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार, वंचितचे प्रकाश आंबेडकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधानानंतर राज्यात खळबळ उडाली होती.

त्यातच शरद पवार हेही या शपथविधीचे वेगळ्या पद्धतीने समर्थन करीत आहेत. त्यांच्यानुसार त्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटण्यास मदत झाली. या प्रकरणावर आता पिंपरीचे (Pimpari) माजी आमदार अण्णा बनसोडे यांनीही वक्तव्य केले आहे. त्यामुळे चर्चांत आता भर पडली.

मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहमतीनेच झाला होता. त्यानंतर मंत्रीमंडळही त्यांच्या सल्ल्याने स्थापन होणार होते, असा दावाही त्यांनी केला होता.

तत्पुर्वी वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही या शपथविधीवरून पवार भाजपचेच असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे जयंत पाटील (Jayant Patil) यांची धांदल उडाली होती.

काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनीच पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट हटवण्यास मदत झाल्याचे विधान केले. त्यामुळे या प्रकरणी राज्यात चर्चांना उधाण आले आहे.

पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनीही एक विधान केले आहे. ते म्हणाले, "अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा साक्षीदार असल्याचे समाधान आणि अजित पवारांना (Ajit Pawar) साथ दिली याचा आनंद आहे. तो शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी होता, हे काल शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे मी जे केले ते योग्यच होते."

पुढे आमदार बनसोडे यांनी ती घटना धक्का देणारी होती, असेही म्हटले आहे. ते म्हणाले की, "शपथविधीच्या अगोदर पहाटेच अजित पवार यांचा फोन आला होता. तुम्ही आहे त्या परिस्थित मुंबईत या, असं अजितदादांनी सांगितले. त्यानंतर साडेतीन तासात तिथे पोहचलो. माझ्या डोळ्याने पाहिले की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत होते. एवढी वर्षे झाले राष्ट्रवादीचे काम करत असल्याने ती घटना माझ्यासाठी धक्का देणारी होती."

पुढे ते म्हणाले की, "मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. दादा जसे म्हटले तस मी केले. म्हणून मी त्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपस्थित होतो. दादा करतील योग्य म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कोण आहे किंवा कोणासोबत शपथ घेत आहेत हे पाहिले नाही. मात्र त्यानंतर तो विधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी होता, असे पवारसाहेबांनी सांगितलं. त्यानंतर मी अजित दादांसोबत राहिलो ते चांगलंच केले. त्याचे समाधान आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT