Ratnagiri News : भाजप नगरसेविकांनी घेतली उदय सामंतांची भेट; रत्नागिरीत चर्चेला उधाण

भाजपच्या दोन्ही नगरसेविकांनी उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांना दिली होती.
BJP Corporators meet Uday Samant
BJP Corporators meet Uday SamantSarkarnama

गुहागर (जि. रत्नागिरी) : गुहागर नगरपंचायतीमधील शहरविकास आघाडीच्या चार व भाजपच्या (BJP) दोन अशा एकूण ६ नगरसेविकांनी रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) उदय सामंत (Uday samant) आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू भैया सामंत यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे (shivsena) गुहागर तालुकाप्रमुख दीपक कानगुटकर उपस्थित होते, त्यामुळे या भेटीची चर्चा गुहागरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (BJP corporators meet Uday Samant)

दरम्यान, आम्ही भाजपमध्ये आहोत आणि भविष्यातही राहू. उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी आमच्या प्रभागांमध्ये निधी दिला; म्हणून त्यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही उदय सामंत यांची भेट घेतली. तालुकाध्यक्षांना सांगून मंत्री महोदयांची भेट घेतल्यानंतरही त्याबाबत वेगळी चर्चा होत असेल, आमच्या प्रामाणिकपणावर, निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात असेल तर ते चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नगरसेविका मृणाल गोयथळे व भाग्यलक्ष्मी कानडे यांनी दिली.

BJP Corporators meet Uday Samant
Kasba By Election : भाजपचे माजी आमदार परिचारकांचा कट्टर समर्थक पुण्यात करतोय काँग्रेसच्या धंगेकरांचा प्रचार

भाजपच्या दोन्ही नगरसेविकांनी उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांना दिली होती. त्यानंतरही सुरू झालेल्या चर्चांना विराम मिळावा; म्हणून खुलासा करतोय, असे सांगत भाजपच्या नगरसेविका गोयथळे म्हणाल्या की, माझ्या प्रभागातील एका पाखाडीसाठी निधी हवा होता. हा निधी उदय सामंत यांनी मंजूर करून दिला तसेच त्यांनी घेतलेल्या रोजगार मेळाव्यात माझ्या प्रभागातील काही तरुणांनी अर्ज केले होते. त्याचा पाठपुरावा करायचा होता. या दोन्ही कामांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भेट घेणे मला आवश्यक वाटले.

BJP Corporators meet Uday Samant
Future CM Posters : माझे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्स लावणाऱ्यांना पोलिसांनी शोधावे : सुप्रिया सुळे

भाजपच्या नगरसेविका कानडे म्हणाल्या की, आमच्या प्रभागातील नारायण मंदिर ते समुद्र पाखाडीच्या नूतनीकरणासाठी सुमारे एक कोटीचा निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केला आहे. या कामाचा प्रस्ताव आता तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. हा निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी सदिच्छा भेट घेण्याचे आम्ही ठरवले होते.

BJP Corporators meet Uday Samant
Solapur University : अहिल्यादेवी स्मारक समितीतून रोहित पवार आऊट; गोपीचंद पडळकर समर्थकांची वर्णी

आम्ही दोघी गेली अनेक वर्षे कोणतेही पद नसताना भाजपचे प्रामाणिकपणे काम करत आहोत. भाजपने आम्हाला नगरसेविका होण्याची संधी दिली. त्यानंतरही नगरसेविका म्हणून ज्यांनी निवडून दिले त्या मतदारांची कामे करत आहोत. प्रभागाच्या विकासासाठी झटत आहोत. पक्ष संघटना वाढावी म्हणून निःस्वार्थपणे काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com