Pune News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळी गालबोट लागले आहे. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर निकाल मान्य नसल्याने डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या पैलवान शिवराज राक्षे याने प्रचंड गोंधळ घातला आणि त्यानंतर त्याने थेट पंचांना लाथ मारली. यानंतर सध्या या कुस्तीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. काही निकाल योग्य असल्याचा बोलत आहे. तर काही राक्षे यांच्यावर अन्याय झालं असल्याचं सांगत आहेत.
मात्र, आता हा मुद्दा आता फक्त कुस्तीच्या आखाड्यापुरता मर्यादित राहिला नसून यामध्ये आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्याने आता हा वाद राजकीय आखाड्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील राक्षे यांच्यावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी थेट राक्षे याची बाजू घेत त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले आहे.
कुस्तीच्या आखाड्यातील हा गोंधळ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत झाली व पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनला आहे. मात्र यानंतर कुस्तीगीर संघटनेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली आहे.
या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत .राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार म्हणाले, प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्धाचा सन्मान करणारा असतो. अशा परिस्थितीत पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही, परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येते? याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का, हेही बघितलं पाहिजे. मल्ल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यासह सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करणं हे अन्यायकारक आहे. त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या कारवाईचा पुनर्विचार करावा शिवाय पुन्हा असा प्रकार होऊ नये, याबाबत परिषदेने आत्मपरिक्षण करण्याचीही गरज असल्याचं रोहित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.