Supriya Sule, Eknath Shinde Latest News sarkarnama
पुणे

..तर अजितदादांना मुख्यमंत्री करा; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री शिंदेंना खोचक टोला

Supriya Sule : हा काही राजकारणाचा विषय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे.

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule : 'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकल्प गुजरातला गेल्यावरून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आज (ता.१५ सप्टेंबर) पुण्यात राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले आहे.

सुमारे १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) जोरदार टीकास्र सोडलं. शिंदे यांनी आता घरगुती दौरे बंद करून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करावं,अशा शब्दात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टोला लगावला आहे. (Supriya Sule, Eknath Shinde Latest News)

हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावर सुप्रिया सुळेंनी खोचक शब्दात समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, मी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की, त्यांनी अजितदादांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावं, आम्ही त्यांना केंद्रात मोठं पद देऊ, असा उपरोधिक टोला सुळेंनी लगावला आणि शिंदे सरकारवर टीका केली.

पुढे त्या म्हणाल्या की, 'वेदांता' कंपनी गुजरातला जाणे हा काही राजकारणाचा विषय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी एकत्र यावं आणि सर्वांनी एकत्रितपणे केंद्र सरकारला विनंती करावी, ही गुंतवणूक महाराष्ट्राला ऑन मेरीट मिळाली आहे, ती ऑन मेरीटच राहिली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रकल्प मिळत असेल तर त्यात गैर काहीच नाही. मात्र महाराष्ट्राचा प्रकल्प तिकडे गेला, हे मोठं दुर्दैव आहे. यामुळे लाखो नोकऱ्या जाणार असून राज्य सरकारला माझी विनंती की, त्यांनी यावर राजकारणं न करता आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढावे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी इतर दौरे रद्द करून यावर चर्चा करावी आणि आता घरगुती दौरे बंद करावे तसेच जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने राज्याचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याबरोबरच राज्यातील इतर नेत्यांनीही या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच घेरले आहे. यामुळे भाजप आणि शिंदे सरकार सध्यातरी बॅकफुटवर गेल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT