Ajit Pawar Baramati : अजित पवार यांनी आज बारामतीत आयोजित केलेल्या जाहीर सभेतून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. अजित पवार यांनी संपूर्ण भाषणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टिका करण्याची टाळलेली रणनिती अनेकांच्या भुवया उंचवणारी ठरली.
"वरुणराजाने वर्षाव करुन आपल्याला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज 'जन सन्मान' रॅलीच्या माध्यमातून उभा आहे", एवढं बोलून अजितदादांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष चिन्हासह मिळवल्यानंतर अजितदादा पहिल्यादांचा लोकसभा निवडणुकीला समोरे गेले. चार जागा लढवल्या. त्यात एक जागा जिंकली. विधान परिषद निवडणुकीत दोन जागा खेचून आणल्या. आता अजितदादा आणि त्यांच्या टिमची विधानसभा निवडणुकीची अग्निपरीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर अजितदादांनी बारामतीतून निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असले, तरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर बोलणे टाळलं आहे.
राष्ट्रवादी फुटल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरचं पाणी वाहून गेले. तेव्हापासून अजितदादांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी एकही शब्द उच्चारलेला नाही. विधान परिषद निवडणुकीतील यशानंतर लगेचच बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा आणि जनसन्मान रॅलीत अजितदादा काहीतरी बोलतील असे वाटत असताना त्यांनी फक्त सरकारी योजनांवर भर दिला.
विधानसभा मतदान होईपर्यंत ही जन सन्मान रॅली थांबणार नाही. संपूर्ण राज्य ढवळून काढणार आहे, असे सांगून लोकसभेला वेगळे वातावरण निर्माण झाले. आम्ही विकासावर बोलत होतो, त्या सर्वांना बाजूला ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली ती घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला. सत्ता येते जाते... कोण ताम्रपट घेऊन आलेला नाही. आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही. मात्र त्या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसांसाठी करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून मागे खेचायचे आहे. तुम्ही घाबरु नका राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास अजित पवार यांनी दिला.
जीवात-जीव आहे, तोपर्यंत संविधानाला कोणला धक्का लावू देणार नाही. कोण भावनिक करत असेल, तर भावनिक होऊ नका. त्यातून विकास होत नाही. बारामती बघत, बघत मला महाराष्ट्र फिरायचा आहे. त्यामुळे हे काम माझ्या घरचे नसून सर्वांचे आहे, असे समजून इथल्या माझ्या लोकांनी जबाबदारी पार पाडायची आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.