Video Ajit Pawar : अजितदादांनी 33 मिनिटांच्या भाषणात वाचली सरकारी योजनांची यादी; विरोधकांना दिलं खमकं उत्तर...

Ajit Pawar baramati assembly constituency : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. मला बारामती बघत बघत 13 तालुके, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, महाराष्ट्र फिरायचा आहे, असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : लोकसभेत आलेल्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) जनसन्मान रॅलीद्वारे बारामतीमध्ये आज (रविवारी) शक्तिप्रदर्शन केले. आपल्या 33 मिनिटांच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हवर भरोसा ठेऊ नका, मी शब्दाचा पक्का आहे, विकास, महिला, शेतकऱ्यांचे प्रश्न महायुती सरकार सोडवत आहे, लाडकी बहीण, सरकारच्या योजना या मुद्यांवर भर दिला. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक बारामतीमधून लढणार की नाही, यावर थेट भाष्य करण्याचे अजित पवार यांनी टाळले.

राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. मला बारामती बघत बघत 13 तालुके, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, महाराष्ट्र फिरायचा आहे. इथल्या आया बहि‍णींनी, इथल्या तरुण तरुणींना, वडिलधाऱ्यांनी इथली जबाबदारी पार पडायची आहे, असे अजित पवार म्हणाले.

मित्रांनो भावनिक होऊ नका, विकासाचे ध्येय ठेवून पुढे जायचे आहे. आम्ही जो वादा करतो तो पूराच करत असतो. या सगळ्या योजना आहेत. माझं आया बहिणींना, महिलांना, मुलींना सांगणं आहे. कुणी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आमचा दादांवर, महायुतीवर विश्वास आहे, असे ठासून सांगा, असे आवाहन अजित पवार Ajit Pawar यांनी केले.

Ajit Pawar
Video Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांचा मोठा आरोप, 'बारामतीमधून फोन गेला आणि...'

चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही, आम्ही कोणाला धक्का लावू देणार नाही, हा तुमच्या दादाचा वादा आहे, असे अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्यांनो जनसन्मान रॅली निघाली आहे. विधानसभा निवडणूक होण्याच्या आधी आपल्याला महाराष्ट्र ढवळून काढायचा आहे. प्रत्येक तालुका ढवळू काढायचा आहे, असे म्हणत अजित पवरांनी निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंगले.

अजित पवार म्हणाले, "अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व महिलांना 'लाडकी बहीण योजने'चा फायदा मिळणार आहे. तीन गॅस सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. बारामतीतील महिलांना 'लाडकी बहीण योजने'साठी वर्षांला 180 कोटी रूपये मिळणार आहेत. महाराष्ट्रात 'लाडकी बहीण योजने'साठी 46 हजार कोटी रूपये मिळणार आहेत. काही-काही राज्यांचे बजेट एवढे नाहीत."

शरद पवार, सुप्रिया सुळेंवर टीका टाळली

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत होते. बारामतीमध्ये होत असलेल्या जनसन्मान रॅलीत अजित पवार सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यावर काय बोलणार याची उत्सुकता होती. मात्र, अजित पवारांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करण्याचे टाळल्याचे दिसून आले.

Ajit Pawar
NEXT CM : सत्तारांच्या दाव्याने महायुतीत वाद वाढणार; ‘पुढच्या आषाढीला एकनाथ शिंदेच विठ्ठलाची महापूजा करतील’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com