पुणे : कोरोनाची रूग्णसंख्या पुण्यात कमी होऊ लागली आहे. आज शहरात एकही मृत्यू नाही. दिवसभरात कोरोनाचे ९६ नवे रूग्ण सापडले असून १०४ जण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
विविध रूग्णालयात १३९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या आणखी कमी झाली असून ८३२ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत.आज एकुण पाच हजार ४९० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत ५ लाख हजार चार हजार १६ रूग्णांची नोंद पुण्यात झाली आहे.यापैकी चार लाख ९४ हजार १११ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाच्या दोन लाटांचा भयंकर अनुभव राज्याने घेतला. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात गेल्या वर्षी 9 मार्चला आढळला. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली. सुमारे सहा महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये राज्यात एका दिवशी नव्याने निदान होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक नोंदली गेली.
फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख उतरता होता. पण, त्यानंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. ही कोरोनाची दुसरी लाट ठरली. गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून उच्चांकी रुग्णसंख्येचा आकडा गाठण्यासाठी सहा महिने लागले होते. दुसऱ्या लाटेचा तडाखा इतका मोठा होता की, अवघ्या तीन महिन्यांमध्ये दुसऱ्या लाटेतील कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग राज्यभर कमी होत आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.