पुण्यात नगरसेवकांची संख्या १८९ वर जाणार

मुंबई वगळता राज्यातील सर्वच महापालिकांना हा निर्णय लागू होणार आहे.
Pmc Pune
Pmc PuneSarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्यातील महापालिकांमधील सदस्यसंख्या १५ टक्केंनी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार पुण्यात २५ नगरसेवक वाढणार आहेत.सध्या पुण्यात १६४ नगरसेवक आहेत. नव्या निर्णयाप्रमाणे नगरसेवकांची संख्या २५ ने वाढणार असून पुण्यातील एकुण नगरसेवकांची संख्या १८९ वर जाणार आहे.

वाढलेल्या सदस्यसंख्येला अनुसरून प्रभाग रचना करावी लागणार आहे. पुण्यात तीन सदस्यांचे ६३ प्रभाग होतील. यामध्ये अनुसूचित जातींसाठी १३.४ टक्के असून त्यानुसार अनुसूचित जातींच्या प्रवर्गासाठी २५ जागा राहणार आहेत. अनुसूचित जमाची प्रवर्गासाठी १.२ टक्के आरक्षणानुसार दोन जागा मिळतील.

Pmc Pune
पुण्यात नवीन कोरोना रूग्णांच्या दीडपट कोरोनामुक्त

इतर मागास प्रवर्गासाठी ५१ टक्के आरक्षणानुसार ५१ तर खुल्या गटासाठी १११ जागा मिळतील. 111 जागांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने सर्व गटातील महिलांसाठी ९४ जागा मिळतील.सर्वसाधारण गटातील पुरुषांना 55 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Pmc Pune
गँगस्टरच्या पत्नीचा भाजप प्रवेश? : चंद्रकांत पाटील म्हणतात...

मुंबई वगळता राज्यातील सर्वच महापालिकांना हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना करण्याचे काम हाती घेण्यात येईल. यानुसार पुण्यात तीन सदस्यांचे ६३ प्रभाग होतील.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com